Breaking News

रस्तालुटीत देवकर यांचे ८५ हजार लंपास


कोपरगाव श. प्रतिनिधी : 

तालुक्यातील झगडे फाटा ते सावळीविहीर रस्त्यावरून यशवंत रामचंद्र देवकर हे पायी जात असतांना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना लुटल्याची घटना सोमवारी रात्री घडली. चोरट्यांनी देवकर यांना अडवून चाकूचा धाक दाखवुन त्यांच्याकडील १० हजार रुपये असलेली बॅग, २ सोन्याच्या अंगठ्या, १ मोबाईल असा ८५ हजाराचा ऐवज लुटला. याप्रकरणी देवकर यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.