Breaking News

नादिया मुराद आणि डॉ. डेनिस यांना शांततेचं नोबेल


ओस्लो : महिलांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या नादिया मुराद आणि डॉ. डेनिस मौकेज या दोघांना शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला. नादिया या इराकच्या याझदी समुदायातल्या आहेत. आयसीसच्या अतिरेक्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचार पीडीत मुलींच्या पुनर्वसनाचं मोठं काम त्यांनी केल. तर डॉ. डेनिस मौकेज हे काँगो या देशातले सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी बलात्कार पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी उत्तम काम उभं केलं.

नोबेल पुरस्कार समितीने नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं या पुरस्काराची घोषणा केली. याझदी हा इराकमधला अल्पसंख्याक समुदाय आहे. आयसीसने या समुदायातल्या तीन हजार मुलींचं अपहर करून त्यांचा ’सेक्स स्लेव्ह’ म्हणून वापर केला. त्यात नादिया मुरादही होती. आयसीसच्या ताब्यातून सुटल्यानंतर तीने अशा पीडीत मुलींसाच्या हक्कासाठी चळवळ उभारली आणि जगाचं लक्ष वेधून घेतलं.डॉ. डेनिस यांनी काँगोतल्या यादवीत होरपळलेल्या 85 हजार महिलांवर उपचार केलेत. त्यांनी बुकाव्हू इथं हॉस्पिटल उभारून गृहयुध्दात लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांवर उपचार केला आणि त्यांना आधार दिला. संयुक्त राष्ट्रानेही त्यांच्या या कामाची दखल घेतली होती.