Breaking News

विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी मैंद्यात शिवसैनिकांची फौज सज्ज


बीड(प्रतिनिधी):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून, शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्कप्रमुख खा चंद्रकांतजी खैरे साहेब, संपर्कप्रमुख सुधीरजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभांवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असून पक्षसंघटनवाढ व विस्तार या धोरणानुसार ’शाखा उदघाटनाचा झंझावात’ सुरु करत मैंदा(पोखरी) येथे शिवसेना व युवासेनेच्या ४ शाखांचे उदघाट्न जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या उदघाटनसमयी येत्या काही दिवसात नाळवंडी सर्कलच्या गावोगाव शाखाउदघाटनाची झंजावात सुरूच ठेवण्यात येणार असून अख्खे नाळवंडी सर्कल भगवेमय होणार असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी सांगितले. नाळवंडी सर्कलमधील मैंदा(पोखरी) हे गाव राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून आजपर्यंत ओळखले जात होते. शिवसेना जिल्हाप्रमुखपदी कुंडलिक खांडेंची निवड झाल्यानंतर या गावात शिवसेनेबाबत अनुकूलता निर्माण होऊन इन्कमिंग सुरु झाली होती. काल शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंच्या हस्ते येथे ४ शाखांचे उदघाटन संपन्न झाले.