Breaking News

शासनाने इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांच्या संरक्षणात वाढ करावी


बीड (प्रतिनिधी) - आपल्या व्याख्यानातून महापुरुषांचे विचार सर्व जाती धर्मातील समाजाला जागृत करण्याचे कार्य इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे हे करत आहेत. परंतू त्यांना फोनवरुन अज्ञात लोक धमक्या देत आहेत. श्रीमंत कोकाटे हे पुरोगामी विचारसरणीचे आहेत. त्यांच्या व्यक्तीमत्वावर संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे बाबा, क्रांतीसिंह नाना पाटील, डॉ. शरद पाटील यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. आपल्या व्याख्यानातून वरील महापुरुषांचे विचार सांगून भारतातील तसेच महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना (बहुजन समाजाला) जागृत करण्याचे काम करत आहेत. त्यांना निनावी नावाने फोनवरुन धमक्या येत असून त्यांच्या जीवीताला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे शासनाने त्यांच्या संरक्षणात वाढ करावी अशी मागणी प्रसिध्दी पत्रकाद्वारे महात्मा फुले अकादमीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन काळकुटे यांनी केली आहे. 
श्रीमंत कोकाटे ते इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि संशोधक आहेत. ‘महात्मा जोतीबा फुले इतिहास अकादमी’ चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महात्मा ज्योतीबा फुले इतिहास अकादमाची माध्यमातून इतिहासाचे ते संशोधन करत आहेत. वेद आणि १८ पुराणे आणि मनुस्मृती ग्रंथाची चिकीत्सक अभ्यास करुन स्त्रीयांवर अशी बंधने आले. त्यातील रुढी परंपरा अशा चुकीच्या आहेत. हे त्यांनी आपल्या व्याख्यानातून सर्व जाती धर्माला जागृत करण्याचे कार्य करीत आहेत. त्यांनी संत तुकाराम महाराजांचा खून कोणी केला? या विषयी आपल्या व्याख्यानातून स्पष्ट मत मांडत आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा चिकीत्सक अभ्यासक करुन ‘विश्‍ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज’ हा ग्रंथ लिहिला. त्यांनी या ग्रंथात शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण?, भवानी मातेचे तलवार प्रकरण, अफजलखान प्रकरणाच्यावेळी रुस्तूमेज खान याने कशी गुप्त पणे कशी मदत केली?, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनीक, पहिली शिवजयंती कोणी सुरु केली? या विषयी त्यांनी ग्रंथात स्पष्ट मते मांडली आहेत. अनेक व्याख्यानातून खरे शिवचरित्र ते सांगतात. शिवचरित्रावर भारतातच नव्हे तर परदेशात त्यांची व्याख्याने होतात. त्यातून ते बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम करत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा खून मनुस्मृतीप्रमाणे कोणी करावयास औरंगाजेबास लावले हे ते व्याख्यानातून स्पष्ट सांगतात. सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना युपीएस्सी, एमपीएसी. चा अभ्यास कसा करावा हे ते अनेक व्याख्यानातून सांगतात. 
अशा प्रकारे चिकीत्सक अभ्यास करुन बहुजन समाजाचे आर्थिक शोषण कोण करीत आहे श्रीमंत कोकाटे अनेक व्याख्यानातून सांगतात. म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या संरक्षणात आणखी वाढ करावी. त्यामुळे त्यांचे पुरोगामी विचार टिकून राहतील. तसेच त्यांना इतिहास अभ्यास व संशोधन यात आडथळा येणार नाही.या करीता महाराष्ट्र शासनाने श्रीमंत कोकाटे यांच्या संरक्षणात वाढ करावी अशी मागणी महात्मा फुले अकादमीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन काळकुटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.