गोल्ड क्लस्टरमुळे नगरची नवी ओळख होणार : खा. गांधी


नगर । प्रतिनिधी -
नगरमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या गोल्ड क्लस्टरमुळे नगरची नवी ओळख निर्माण होणार असून, नावलौकिकात भर पडणार आहे. हॉलमार्क मानांकन मिळविण्यासाठी याआधी सर्वांना पुणे, मुंबईला जावे लागत असे. यामुळे नगरमध्येच हॉलमार्क मिळणार असल्याने व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा वाचणार आहे. याचा फायदा सर्व ग्राहकांना होणार आहे. यामुळे ब्रॅण्डेड सोने उपलब्ध होणार आहे. प्रकाश लोळगे यांनी या गोल्ड क्लस्टरच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरवठा केला. त्यांच्या जिद्दीमुळेच हे गोल्ड क्लस्टर पूर्णत्वास येत आहे. नगरच्या नावलौकिकात व वैभवात भर घालणार्‍या या गोल्ड क्लस्टरचे लोकार्पण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य समारंभाने होणार असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली.

रामचंद्र खुंट येथील करशेटजी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक गोल्ड ज्वेलरी कौन्सिलचे (क्लस्टर) काम पूर्णत्वास येत आहे. खा. गांधी यांनी गोल्ड क्लस्टरला भेट देऊन सर्व अत्याधुनिक मशिनरींची पाहणी केली. गोल्ड क्लस्टरचे अध्यक्ष प्रकाश लोळगे यांनी खा. गांधी यांना यंत्रसामुग्रीबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी संजय शिंगवी, सुभाष कायगांवकर, राजेंद्र शहाणे, अमोल देडगांवकर, श्यामराव देडगांवकर, ईश्वर बोरा, प्रमोद बुर्‍हाडे, कैलास मुंडलिक, संजय वालकर, राजेंद्र लोळगे, दत्ता मैड, सोमनाथ मैड, श्याम मुंडलिक, वैजिनाथ चिंतामणी, श्याम लोणकर, पियुष भंडारी, प्रकाश डहाळे, भाजपचे सरचिटणीस किशोरा बोरा, पुण्याचे उद्योजक संजय कांबळे, गोपाल वर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी प्रकाश लोळगे म्हणाले, खा. गांधी यांच्या पाठपुराव्यामुळे यासाठी 6 कोटीहून अधिक निधी उपलब्ध झाला आहे. क्लस्टरचा जिल्ह्यातील सुमारे 50 हजार सुवर्णकार व्यावसायिकांना फायदा होणार आहे

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget