ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णा देवींचे निधन


मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीतात आपला खास ठसा उमटवणार्‍या ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे शनिवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. मृत्यू समयी त्या 91 वर्षांच्या होत्या. शास्त्रीय संगीतात अलौकिक व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. अन्नपूर्णा यांचा जन्म 1927 मध्ये मध्यप्रदेशातील मैहर या ठिकाणी झाला. 4 भावंडांमध्ये अन्नपूर्णा देवी या धाकट्या होत्या. शास्त्रीय संगीताचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. उत्साद बाबा अल्लाउद्दीन खान यांच्या त्या कन्या होत्या. सैना-मैहर घराण्यातील सतारवादक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. 

पद्मभूषण पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते. सरोदवादक आशिष खान, सरोदवादक अमित भट्टाचार्य, सरोदवादक बहाद्दुर खान, सरोदवादक बसंत काब्रा आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया हे अन्नपूर्णा देवींचे शिष्य आहेत. अन्नपू्र्णा देवी यांनी पंडित रविशंकर प्रसाद यांच्याशी विवाह केला. त्यांना शुभेंद्र शंकर नावाचा मुलगा होता. मात्र 1992 मध्ये शुभेंद्र यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अन्नपूर्णा देवी यांनी रविशंकर प्रसाद यांच्यासोबत घटस्फोट घेतला आणि त्यांनी ऋषीकुमार पंड्या यांच्यासोबत लग्न केले. 2013 मध्ये ऋषीकुमार पंड्या यांचा मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून अन्नपूर्णा देवी एकांतवासात गेल्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्यांना विविध व्याधींनी ग्रासले होते. त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारही सुरू होते. शनिवारी पहाटे 3 वाजून 51 मिनिटांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget