आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल


राहुरी/प्रतिनिधी : दोन वर्षांपूर्वी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नासिक येथिल दोन जणांविरुद्ध सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने या बाबत तर्कवितर्क लावले जात आहे. महंमद गफुर सय्यद (वय वर्ष 55राहणार दरडगाव तर्फे बेलापुर, ता.राहुरी) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचे नाव आहे. बँक व सोसायटीचे कर्ज थकले. व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे, त्यांनी 30 सप्टेंबर 2016 रोजी राहत्या घरात विषारी औषध घेतले होते. दुसर्‍या दिवशी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी तहसिलदार यांच्याक वडे राहुरी पोलीस ठाण्यात शेतकरी आत्महत्येची नोंद झाली होती.

दरम्यान, मृत सय्यद यांच्या पत्नी आशाबी यांना घरातील सामान मध्ये मयताने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात, विनायक गोदरे व रोहीत विनायक गोदरे दोघे (रा. नाशिक रोड, शिखरेवाडी, चैतन्य बिल्डींग जि. नाशिक) यांना तीस लाख रुपये हात उसने दिले आहेत. परंतु, त्यांनी पैसे परत न देता पाच कोरे धनादेश दिले. त्यामुळे मी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करीत आहे. असा उल्लेख आढळला. याप्रकरणी आशाबी महंमद सय्यद (वय 52 राहणार सय्यद वस्ती, दरडगाव तर्फे बेलापुर) यांच्या फिर्यादीवरून, विनायक व रोहित गोदरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेतकरी आत्महत्येचा एक लाखाचे अनुदान घेण्यात आल्याचे महसुल प्रशासनाकडुन माहिती दिली आहे. पोलिसात गुन्हा उशीराने दाखल झाल्याने या बाबत वेगवेगळ्या चर्चाला उधाण आले आहे. घटनेचा तपास पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. देशमुख करत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget