वैचारिकतेसाठी ‘दिसामाजी काही वाचित जावे’


अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. तशी वाचन ही माणसाची चौथी मुलभूत गरज व्हावी. कारण वाचन हे माणसाच्या व्यक्तीमत्वाला खतपाणी घालत असते. माणसातल्या वेगवेगळ्या संस्काराची जोपासना वाचन या संस्काराने होत असते. वाचनाने ज्ञान तर मिळतेच पण व्यक्तीची विचार करण्याची क्षमतावाढते. ती वाढल्याने मानसात वैचारिकता तयार होते. त्यामुळेच दररोज काही तरी वाचण्याची प्रत्येकाने आवड जोपासणे आवश्यक आहे. 
जशी शरिराला व्यायामाची गरज असते. तशी मनाला वाचनाची गरज असते. वाचनाचा संस्कार जाणिवपूर्वक जोपासला पाहिजे. वाचनाने मनाचे जीवन समृद्ध होते. मनाला सुविचारी, संस्कारी करण्यासाठी वाचनाची गरज असते. वाचनामुळे भाषेला वळण लागते. विचारात स्पष्टता येते. भारताला पहिले नोबेल हे साहित्यातच मिळालेले आहे. महाराष्ट्राला लेखन साहित्याची, ग्रंथांची परंपरा लाभली आहे. मराठीमध्ये अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध आहेत. अनेक विविध ग्रंथ हेच गुरु मानले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तासन्‌तास वाचत बसत. आपले वाचन हे चौफेर आणि सकल असावे असे म्हणतात, की पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक आहे. वाचन करणारी मानसे जीवनात मोठी होतात. कारण आपल्या जडणघडणीवर वाचनाचा प्रभाव पडतो. वाचनाने मनाचीही स्वच्छता होत असते.

वाचनाचा संस्कार हा लहानपनापासून केला पाहिजे. त्यासाठी आपल्या मुलांना नातेवाईकांना खेळण्याऐवजी पुस्तके आणावीत. दुसऱ्यांच्या वाढदिवसाला वस्तुऐवजी पुस्तके भेट द्यावीत. कोणताही कार्यक्रम असो, शाल-श्रीफल ऐवजी पुस्तके भेट द्यावीत. शाळेला पुस्तके भेट द्यावीत. शाळेतील माजी विद्यार्थ्यांना शाळेला पुस्तके देण्यासाठी प्रेरित करावे. तरुणांनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे गुगलवर शोधण्याऐवजी संदर्भ ग्रंथांचा वापर करावा. समविचारी व्यक्तींनी एकत्र येवून ‘पुस्तकभिषी’ यासारखे उपक्रम राबवावेत. अशा उपक्रमातून आपण वाचनाची आवड निर्माण करु शकतो. आपले जीवन सुखी व समृद्ध करु शकतो. 

शब्दांकन :

शांता मरकड- दहातोंडे, प्राथमिक शिक्षिका, चांदा. 

संकनल :

देवीदास चौरे, चांदा. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget