Breaking News

दुष्काळी तालुक्याच्या यादीत कोपरगावच नाही; लोकप्रतिनिधींकडून मोठा अन्याय : काळे


कोपरगाव / प्रतिनिधी

शासनाने नुकतेच राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील तालुक्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये कोपरगाव तालुक्याच्या सीमेवर असणा-या सिन्नर, वैजापूर, राहाता आदी तालुक्यांचा समावेश आहे. मात्र कोपरगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही या यादीत कोपरगाव तालुका कुठेच नाही. हे या तालुक्याच्या निष्क्रिय आमदारांचे मोठे अपयश असून तालुक्याच्या जनतेवर आमदारांनी मोठा अन्याय केला आहे, असा आरोप कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केला.

कोपरगाव तालुक्यातील तळेगावमळे येथे विविध विकास कामांच्या उदघाटन व भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य राजेश परजणे होते. याप्रसंगी सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, जि. प. सदस्य सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, काळे कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, अॅड. आर. टी. भवर, राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष चारुदत्त सिनगर, सरपंच सचिन क्षीरसागर, उपसरपंच आशा टूपके, रोहिदास होन, दादा टूपके, प्रसाद साबळे, ह. भ. प. शंकर महाराज गाडीवान, दत्तात्रय देवकर, नितीन भवर, उपअभियंता पवार यु. सी., रानमाळ डी. ओ., शाखा अभियंता शिंदे, ग्रामविकास अधिकारी राठोड पी. आर. तसेच खोपडी, धोत्रे, गोधेगाव, घोयेगाव आदी गावातील कार्यकर्ते व तळेगावमळेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, यासंदर्भात आज दि. १५ तहसीलदारांची भेट घेऊन पुढील दिशा ठरविणार आहोत, असे काळे म्हणाले. सूत्रसंचालन मंजाहारी टूपके यांनी केले. साहेबराव शिंदे यांनी आभार मानले.