Breaking News

शॉर्टसर्किटमुळे भीषण आग ; सहा दुकाने जळून खाक


कर्जत प्रतिनिधी

तालुक्यातील माहिजळगाव येथील दुकानात काल दि, ११ रात्री दीडच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत सहा दुकाने जळून खाक झाली. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले. 

माहिजळगाव येथील त्रिमूर्ती फूटवेअर आणि साई टेलर्स या दुकानात आग लागली. यामध्ये अनिल पवार यांचे त्रिमूर्ती फूटवेअर, सचिन सुरवसे यांचे सचिन हेअर सलून, शहाजी इरकर यांचे प्रतीक्षा फोटो, संजीवन सपकाळ यांचे माऊली एजन्सी, विनोद पवार यांचे साई टेलर अँड लॉंड्री, मलू वाघमोडे यांचे पूजा लेडीज शॉपी, स्वरंगी मोबाईल शॉपी, गवारे यांचे कापड दुकान जाळल्याने त्यामध्ये लाखाचे आर्थिक नुकसान झाले. आगीची घटना समजताच गावातील युवकांनी फोनवर एकमेकांना संपर्क करून करून प्रसंगावधान दाखवत आसपासच्या दुकानातील साहित्य बाहेर काढले. युवकांनी बराच वेळ शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी हानी टळली. महसूल विभागाचे अधिकारी एस. एस. अनारसे व राहुल बुक्तरे यांनी जळिताचे पंचनामे केले.