निधी असूनही लोहणेर विकासाला तिलांजली,जिप सदस्यांनी ग्रामसेवकाची केली कान उघाडणी


लोहोणेर ( वार्ताहर ) : - लोहोणेर गावातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असतांनाही लोहोणेर गावात विकास कामे सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करण्यात येत असून गावात अस्वच्छता पसरलेली आहे. त्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत त्यामुळे गावाचा विकास खोळंबला आहे विकास कामे करावयाचे नसतील तर खुर्ची खाली करा अशा शब्दांत जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ धनश्री आहेर यांनी लोहोणेर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यु.बी. खैरनार यांची कानउघडणी केली.लोहोणेर येथे स्वाईन फ्यु आजाराने राजेंद्र परदेशी या प्रगतीशील शेतकरीचे निधन झाले आहे. याचं पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ धनश्री आहेर यांनी आज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.

यावेळी पंचायत समितीच्या सदस्य सौ. कल्पना देशमुख , प्रसाद देशमुख, समाधान महाजन, निबा धामणे, राकेश गुळेचा ,योगेश पवार, आदींनी चर्चेत सहभाग घेतला असता ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी तक्रारी केल्या. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य यांना कळवूनही याबैठकीस हजर नसल्याने जिल्हा परिषद सदस्य धनश्री आहेर यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर , देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील, विस्तार अधिकारी भेय्या साहेब सावंत, मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन सतिष देशमुख, रमेश आहिरे ,अशोक अलई, प्रकाश नेरकर, नाना जगताप, सोपान सोनवणे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान जिल्हा परिषद सदस्य धनश्री आहेर यांनी लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन कामकाजा बाबत सूचना केल्या. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, लोहोणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ. योगेश पवार आदीसह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी लोहोणेर प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेल्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची त्वरित नेमणूक करण्यात यावी अशी मागणी लोहोणेर ग्रामस्थांनी केली

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget