पुरोगामी विचार मंचचे जिल्हा कचेरीवर निदर्शने


बुलडाणा,(प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी उपमुख्य मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍यावर कारवाई करून भुजबळ यांना झेड प्लसची सुरक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आज 29 ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ, महाराष्ट्र माळी महासंघ व बारा बलुतेदार महासंघ व पुरोगामी विचार मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राज्य घटनेला सर्वोच्च मानून फुले, शाहू व आंबेडकराच्या विचारांची कास धरून वाटचाल करीत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना समाज विघातक प्रवृत्तींनी जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पाठवले आहे. 

भुजबळ यांनी मनुस्मृती जाळल्यामुळे मनुस्मृती समर्थकाचे पित्त खवळले आहे. त्यामुळे जीवे मारण्याची धमकी देणार्‍यावर कारवाई करून भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रा. सदानंद माळी, दामोधर बिडवे, कुणाल पैठणकर, संतोष खांडेभराड, अनंता लहासे, विष्णू उबाळे, मधुसूदन सपकाळ, जयश्री शेळके, नंदिनी टारपे, माधवराव हुडेकर, रमेश हिरळकर, राजेश लहासे, निलेश तायडे, शरद राखोंडे, जितेंद्र जैन, के.ओ. बावस्कर, प्रा. अनिल वाघमारे, अनिल राऊत, प्रा. सतिष जाधव, अशोक जाधव, रामु खांडेभराड, भिमराव सिरसाट, अनिकेत खांडेभराड, निलेश शिंगणे, जगदिश मानवतकर, प्रशांत वाघोदे, शेख रफिक शेख नईम, मिलिंद बोदडे, राजु वाकोडे, अनिल कोळसे यांच्यासह पुरोगामी विचार मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget