Breaking News

आ.पाचर्णे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


शिरूर/प्रतिनिधी
शिरूर हवेलीचे आ.बाबुराव पाचर्णे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असुन तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कामगार यांचा मेळावा व कार्यगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आलेले असुन याप्रसंगी हजारो अनाथांना पदरात घेणारी माय सिंधुताई सपकाळ या भेट देऊन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलंडे, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव भुजबळ, तहसिलदार रणजीत भोसले, पोलीस निरीक्षक कैलास घोडके, गटविकास अधिकारी संदिप जठार, प्रकल्प अधिकारी अशोक बांगर, समिती सदस्य शामआप्पा चकोर, जिल्हा संपर्क प्रमुख धर्मेंद्र खांडरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष दादापाटील फराटे, संघाचे जिल्हा सरसंघचालक मदन फराटे व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आबा सोनवणे यांनी दिली.
शिरूर हवेलीचे आ.बाबुराव पाचर्णे यांचा वाढदिवस 1 नोव्हेंबर रोजी असुन त्यानिमित्त तालुक्यात आज दि.26 रोजी पासुन ठिकठिकाणी  विविध समाजोपयोगी उपक्रम राबवुन आमदार पाचर्णे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. आज शुक्रवार दि.26 रोजी वाढदिवसानिमित्त न्हावरा फाटा ता.शिरूर येथील कानिफनाथ मंगल कार्यालयात आज दुपारी 2 वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कामगार यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असुन याप्रसंगी त्यांना बॅग, जेवनाचा डब्बा, पाण्याची बाटली व छत्री असे किट आ.बाबुराव पाचर्णे यांच्या वाढदिसानिमित्त देण्यात येणार असुन कार्यक्रमाचे आयोजन खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे व भाजपा महिला आघाडीच्या शिरूर तालुकाध्यक्षा वैजयंती चव्हाण यांनी केले असल्याची माहिती आबा सोनवणे यांनी दिली.