Breaking News

भारत विद्यालयाचा क्रिकेट संघ राज्यस्तरावर


बुलडाणा,(प्रतिनिधी): नुकत्याच अमरावती येथे पार पडलेल्या 17 वर्षाखालील शालेय विभागस्तर क्रिकेट स्पर्धेत भारत विद्यालय, बुलडाणा संघाने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करीत यवतमाळ, अकोला व अमरावती संघांना पराभुत केले व विभागीय स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त करित राज्यस्तरावर प्रवेश केला. राज्यस्तरावर जाणारा हा भारत विद्यालयाचा हा 32 वा संघ आहे. 

विभागीय स्पर्धेतील ह्या विजयामुळे क्रिकेट या एकाच खेळामधे 500 खेळाडु राज्यस्तरावर खेळण्याचा विक्रम भारत विद्यालयाने केला आहे. याबद्दल अमरावती येथे क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी संघाचे मार्गदर्शक संजय देवल व सर्व खेळाडुंचा विशेष सत्कार केल. या यशाबद्दल भारत विद्यालयाचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे,प्रचार्य एस आर. उन्हाळे, तसेच बुलडाणा क्रीडा अधिकारी शेखर पाटील ,उपमुख्याधापक राम पालवे, पर्यवेक्षक मोहन घोंगटे यांचेसह भारत विद्यालय परिवारातील सदस्यांनी संघाचे अभिनंदन केले. भारत विद्यालयाच्या संघाने आतापर्यंत दोनवेळा राज्यस्तरीय अजिंक्यपद प्राप्त केले असुन 7 वेळा उपविजेतापद व पाचवेळा तृतीय स्थान प्राप्त केले आहे. याद्वारे 50 राष्ट्रीय खेळाडु देखील भारतने क्रिकेट स्पर्धेत दिले आहेत. यावर्षीच विजयी संघ पुढील महिन्यात पालघर येथे होणार्या साज्यस्तरीय स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहे.या स्पर्धेत खेळण्यासाठी जाणारा संघ पुढील प्रमाणे अथर्व किन्हीकर कर्णधार, तुषार वाघ उपकर्णधार, यश गवई यष्टीरक्षक, रितेश तांगडे, अनुराग गवई, अभिषेक चव्हाण,अमेय देवल, वरुण मुठ्ठे, आनंद भोंडे, ऋषीकेश राजपुत,सत्यजीत महामुनी, विशाल चवरे, तुषार खराटे, प्रतिक इंगळे, अजिंक्य काळवाघे, अभिषेक तायडे .या खेळाडुंना संजय देवल, अक्षय चौधरी, वैभव सोनुने, रामकृष्ण भराड, अमोल लहासे हे मार्गदर्शन करित आहे.