Breaking News

भारतात करोडपतींच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ


या नोव्हेंबरमध्ये नोटबंदीला तीन वर्षं पूर्ण होतील. गेल्या चार वर्षांमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या करदात्यांची संख्या 60 टक्क्यांनी वाढून 1.46 लाख झाली आहे. त्याचबरोबर या काळात इनकम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत पण 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

1 कोटीहून जास्त उत्पन्न असणाऱ्यांची संख्या 2013-14 या वर्षात 88,649 होती. तीच संख्या 2017-18 यावर्षात 1,40,139 एवढी झाली.असे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने सांगितले आहेत.