Breaking News

सालपे येथील वृध्देचा खून


लोणंद (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील सालपे येथे पहाटे लघु-शंकेसाठी घरातून बाहेर आलेल्या शांताबाई जयवंत खरात (वय 70) वृध्देवर अज्ञाताने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. वृध्देच्या अंगावरील दागिने लंपास झाल्याने चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा अंदाज आहे.

लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शांताबाई खरात या सोमवारी पहाटे चारच्या सुमारास लघुशंकेसाठी घराच्या बाहेर गेल्या होत्या. 15 मिनिटे त्या घरात न आल्याने त्यांचे पती जयवंत खरात बाहेर गेले. तेव्हा त्यांना शांताबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. जयवंत यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगा संतोष बाहेर आला. त्यांना आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांना उपचारासाठी लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्रात आणले असता त्यांना मृत घोषित केले.