Breaking News

पाणी टँकरसाठी स्वतंत्र यंत्रना कामाला लावा-आ.पवार


गेवराई, (प्रतिनिधी):- तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे ग्रामीण भागात जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अनेक गावांना पाणी टंचाई मुळे ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत तरी ज्या गावांनी टॅकर मागणीचे प्रस्ताव पचायंत समीतीत दाखल केलेले अनेक दिवस झाले आहेत पण पचायंत समीच्या पाणी पुरवठा विभागांतील आधिकारी व कर्मचारी पचायंत समीतीतच नसतात त्यामुळे वारवार चकरा मारून जनता वैतागून गेली आहे तरी टॅकर प्रस्ताव तयार करण्यासाठी स्वतञ यञणा तयार करून पाणी टंचाई असेलेल्या गावांची पहाणी करून लवकरात लवकर पाणी टँकर सुरू अशा सुचना आ.लक्ष्मण पवार यांनी बैठकी दरम्यान आधिकार्‍यांना दिल्या आहेत. मतदार संघातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आ.लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व जि.प. कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जि.प.मुख्यकार्यकारी अमोल येडगे, जि.प.सदस्य पांडूरंग थडके, कार्यकारी अंभियता एस.यु.खंदारे,उपअंभियता अटद, राजेंद्र बागर, दादासाहेब गिरी, गटविकास अधिकारी बागुल, रमेश गिरी, रमेश शेडगे, ईश्वर पवार, कैलास पवार, प्रल्हाद येळापूरे, बाबुराव खाडे, आदि उपस्थित होते