खान इज किंग, दोन वर्षांनंतर रस्त्याला सापडला मुहूर्त, नागरिकांकडुन खान यांचे आभार


अहमदनगर /प्रतिनिधी
लोकशाहीत एखादा लोकप्रतिनिधी प्रभागात उपलब्ध नसेल तर स्थानिक नागरिकांना त्याचे किती तोेटे सहन करावे लागतात. हे मुकूंदनगर येथील नागरिकांनी चांगलेच अनुभवले आहे. तेथील स्थानिक नगरसेवक समद खान यांना गुन्ह्यात अडकविले गेले, त्यामुळे मुकूंदनगरचे किती नुकसान झाले व ते बाहेर येताच किती भरपाई झाली. याचे बोलके चित्र नागरिकांनी मांडले आहे. दोन वर्षे गुन्ह्यात अडकलेले खान निर्दोष झाले आणि अवघ्या चार दिवसात दोन तीन फुट खोल खोदून ठेवलेला मुकूंदनगरचा मुख्य रस्ता दोन वर्षे पडून होंता. तो त्यांनी मार्गी लावला आहे. त्यामुळे तेथे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून तेथे खान इज किंग ठरले आहे.
मुकूंदनगर येथे प्रभाग क्रमांक दहा येथून समद खान हिंदू मतदारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. मात्र, त्याच्यावर एक गुन्हा दाखल झाला. त्यामुळे त्यांना दोन वर्षे कारावास सहन करावा लागला. त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अन्य आरोप खोटे आहेत. हे सांगण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयावर हिंदु समाज्याच्या माहिला व पुरुषांनी मोठा मोर्चा काढला होता. हे एकात्मतेचे प्रतिक तुरळक पहावयास मिळते. खान यांनी मुकूंदनगर येथील फकीरवाडा ते राजनगर हा मुख्य रस्ता तीन वर्षापुर्वी आ. संग्राम जगताप महापौर असताना मंजूर केला होता. त्यावेळी 1 कोटी 90 लाख रुपये निधी मंजूर होऊन तत्काळ काम देखील सुरू झाले होते. मात्र, खान यांना गुन्ह्याला सामोरे जावे लागले, त्यामुळे तब्बल दोन वर्षे हा रस्ता पडून होता. नगरिक खोदलेल्या रस्त्यातून पायवाट करीत घर जवळ करीत होते. हा त्रास दोन वर्षे सहन करावा लागला. दरम्यान खान गुन्ह्यातून निर्दोष सुटले असता त्यांनी चौथ्या दिवशी रस्त्याला 44 कामगार लावून रस्ता पुर्णत्वास आणला आहे. यामुळे 50 हजार नागरिकांनी खान यांचे आभार मानले आहे.

मुकूंंदनगर येथे सद्या प्रभाग रचना बदलल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. या फेरबदलामुळे ज्यांनी पडत्या काळात नागरिकांनी वार्‍यावर सोडले, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, फुटलेले ड्रेनेज, कचराडेपो, आरोग्य अशा समस्यांना सामोरे जावे लागले. त्याचा बदला नागरिक येणार्‍या निवडणुकीत घेतली. यात शंका नाही. तसेच मुकूंदनगरमध्ये एमआयएम, शिवसेना यांचा शिरकाव, नगरसेवकांच्या फुटातूटीचे चिन्ह अशा अनेक घटनांमुळे सद्यातरी मुकूंदनरच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


मला नगरकर व मुकुंदनगर प्रिय आहे.

रस्ता दोन वर्षे रखडला होता. त्याचे काम मी बाहेर आल्यावर केले आहे. नागरिकांची सोय होणे, हाच माझा हेतू आहे. बाकी तो रस्ता कोणाच्या प्रभागातून जातो यात मला स्वारस्य नाही. माझ्या कार्यामुळे मी आत असताना हिंदु-मुस्लिम बांधवांनी महामोर्चा काढून माझ्यावर प्रेम व्यतीत केले. हेच माझे भाग्य आहे. त्यामुळे मला प्रभाग नाही. तर सगळे नगरकर व मुकुंदनगर प्रिय आहे.
- समद खान (नगरसेवक)
हजारो नागरिक त्रासमुक्त

समद खान यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे गेली दोन वर्षे आमचा रस्ता रखडला होता. या रस्त्यामुळे नागरिकांना दोन वर्षे त्रासाला सामोरे जावे लागले. मात्र, खान बाहेर आल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन हजारो नागरिकांना त्रासमुक्त केले आहे.
- सय्यद सदक (नागरिक)

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget