Breaking News

सीबीआयमध्ये लाचखोरी? SIT करणार प्रकरणाची चौकशी


नवी दिल्ली - देशातील प्रमुख गुन्हे तपास संस्था सीबीआयमधील लाचखोरी प्रकरणाने एकच गोंधळ उडाला आहे. केंद्राने आरोप असलेल्या सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवत नागेश्वर राव यांना सीबीआयचे प्रभारी संचालक नेमले आहे. 

याप्रकरणी केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याप्रकरमी माहिती दिली. सीबीआयमध्ये विचित्र स्थिती निर्माण झाली असून आरोपांची चौकशी करण्याचे अधिकार सरकारला नसल्याचे जेटली म्हमाले आहे. तसेच विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.