टाटा व्हिस्टासह 1 लाख 63 हजार रुपयांची दारू जप्त


बुलडाणा,(प्रतिनिधी): ग्रामीण भागात अवैधरीत्या देशी दारूची विक्री करण्यासाठी जात असलेल्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. यावेळी त्यांच्या ताब्यातून टाटा व्हिस्टासह 2 लाख 63 हजार रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई 4 नोव्हेंबर रोजी मलकापूर पांग्रा ते बिबी रस्त्यावर करण्यात आली आहे. साखरखेर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर पांग्रा ते बिबी रस्त्यावर अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

यावरून पथकाने या रस्त्यावर सापळा रचला. काही वेळानंतर त्यांना एम.एच. 28/ व्ही/ 4415 या क्रमांकाची टाटा व्हिस्टा येतांना दिसली. या वाहनास थांबून झडती घेतली असता त्यामध्ये अवैध देशी दारूचा साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी बिबी येथील विलास सखाराम नाळे वय 40 रा. बिबी व अ. समद अ. सलाम वय 32 यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून टाटा व्हिस्टा कार व देशी दारुचे पाच बॉक्स असा एकूण 1 लाख 63 हजार 200 रुपयाचा माल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक शेषराव अंभोरे, पोहेकॉ आत्माराम जाधव व संभाजी असोलकर यांनी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्या ताब्यातून टाटा व्हिस्टासह 2 लाख 63 हजार रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई 4 नोव्हेंबर रोजी मलकापूर पांग्रा ते बिबी रस्त्यावर करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध देशी दारू विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget