Breaking News

अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार प्रकरणी 10 वर्षाचा सश्रम कारावास व 15 हजाराचा दंड


ठाणे : प्रतिनिधी

16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून जीपमध्येच तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या 30 वर्षीय जीप चालक असिफ अकबर कोतवाल(30) याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि साक्षीदार तसेच वैद्यकीय आवाहल याच्या आधारावर दोषी ठरवीत विशेष पोस्को न्यायालय आणि जिल्हा न्यायधीश पी. पी. जाधव यांनी 10 वर्षाचा सश्रम कारावास आणि 15 हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली.


ग्रामीण भागातील जव्हार तालुक्यातील पवारपाडा परिसरात राहणारा आरोपी असिफ अकबर कोतवाल हा जीप ड्रायव्हर आहे. 30 मे 2015 रोजी पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत चुलत भावाच्या लग्नासाठी नेहले बुद्रुक येथून भेवरदाचा पाडा येथे गेली होती. लग्नसोहळा आटोपून घरी कुटुंबासोबत परतत असताना जीप आरोपी असिफ अकबर कोतवाल चालवीत होता. जीप आपटाळे आणि अन्य ठिकाणी आल्यानंतर जीपच्या काचा बांध करून जीप कपारीचा पाडा नेहले आणि नंतर काळशेटी गावात आरोपीने जीप रात्री 11 वाजण्याच्या सुमारास उभी केली आणि जीपच्या लाईट बंद करून मुलीवर अत्याचार जीपमध्येच केला. मध्यरात्रीनंतर आरोपीची जीप 4 वाजण्याच्या सुमारास अन्य गावात आढळली. त्यांनी आरोपीला पकडून पीडित मुलीची सुटका केल्याचा युक्तीवाद सरकारी वकील विवेक कडू यांनी केला. त्यानंतर पकडलेल्या आरोपी असिफ अकबर कोतवाल याच्यावर अत्याचार आणि अपहरणाचा तसेच पोस्को कायदा 2012 अनुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान न्यायालयात सादर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि साक्षीदार तपासले. सरकारी वकिलांनी आरोपीवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यात पुराव्याच्या सहाय्याने यश मिळवले.

पोस्को विशेष न्यायालयाचे जिल्हा न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांनी आपल्या निकालात जीप चालक आरोपी असिफ अकबर कोतवाल याने 16 वर्षीय पिडीतांवर अत्याचार केला. त्याचे पुरावे वैद्यकीय अवाहाल यामुळे आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाले. आरोपीने पिडीताचे अपहरण करून तिच्यावर जीपमध्येच अत्याचार केल्याचे स्पष्ट झाल्याने आरोपीला 10 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि 15 हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली.