बोंडअळीचे तिसर्‍या टप्प्यातील 10 कोटी 36 लाख अखेर वर्ग : आ. मुरकुटे

नेवासा/प्रतिनिधी
दिवाळीच्या पूर्वसंध्येला बोंडअळीच्या तिसर्‍या टप्प्यातील 10 कोटी 36 लाख रुपये अनुदान नेवासा तहसील कार्यालयाकडे जमा करण्यात आले असल्याची माहिती आमदार मुरकुटे यांनी दिली. यावेळी बाळासाहेब मुरकुटे यांनी असे प्रतिपादन केले की, मी व आ. शिवाजीराव कर्डीले यांनी याकामी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तसेच पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे पाठपुरवठा करून प्रलंबित असलेले अनुदान शेतकर्‍यांना मिळण्यास पाठपुरावा केला. नगर जिल्ह्यात सर्वाधिक नेवासा तालुक्यासाठी 29 कोटी 26 लाख अनुदान मिळाले आहे. 

याआधी मागील पहिल्या व दुसर्‍या टप्प्यातील 87 गावातील बोंडअळीचे एकूण 18 कोटी 90 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. मात्र उर्वरित शेवटच्या तिसर्‍या टप्प्यातील 40 गावच्या शेतकर्‍यांचे पैसे लवकरात लवकर शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्या विशेष प्रयत्नाने हे अनुदान शेतकर्‍यांना मिळणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकर्‍यांसाठी जी मदत मिळण्यासाठी तत्पर राहील असेही मुरकुटे यांनी सांगितले. तसेच 2016-17 साली पुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांसाठीही 61 लाख रुपये अनुदान मंजूर झालेले असून पूरग्रस्तांचे पैसे ही लवकरात लवकर खात्यात जमा होणार आहे. असे एकूण 29 कोटी 26 लाख रुपये अनुदान नेवासा तालुक्यासाठी मिळाले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget