100 कोटींचा तिजोरीवर बोजा - परिवहन अस्थायी कामगार होणार स्थायी, सर्वच खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार सहाव्या वेतन आयोगाचे भत्ते !


ठाणे : प्रतिनिधी

ठाणे पालिकेच्या परिवहन अस्थायी परिवहन कर्मचारी हे डिसेंबर पासून कायस्वरूपी होणार आहे. शवसेनेच्या पाठपुराव्यामुळे पालिका आयुक्तानी सगळ्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला. दिवाळीच्या उंबरठ्यावर ही बातमी पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत घोषणा केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी फटाक्याच्या आतषबाजीत या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयाने परिवहनच्या कर्मचाऱ्यांचा 14 वर्षाचा वनवास संपला.


ठाणे परिवहन सेवेत सध्या सुमारे दोन हजार कर्मचारी काम करत असून पुढील तीन-चार वर्षांत 30 ते 40 टक्के कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे टीएमटीला भविष्यात मोठ्या प्रमाणात कर्मचारी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे, तर दुसरीकडे गेल्या 14 वर्षांपासून परिवहन सेवेत अस्थायी स्वरूपात कर्तव्य बजावणारे सुमारे 613 चालक, वाहक कायम नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ठाणे महापालिकेने नोकरीत कायम करून घ्यावे. यासाठी शिवसेनेच्या आणि परिवहन समितीने प्रयत्न केले. कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या मार्गी लावत असताना अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीएमटी कर्मचारी संघटनेच्या निवडणुकीच्या वेळी दिली होती. या वचनाची पूर्ती आता लवकरच होणार आहे.


पालिकेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम,
ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचारी याना किमान वेतन कायद्यानुसार फरकाची रक्कम पाच टप्प्यांत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही आज जाहीर करण्यात आला. याचा फायदा घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे कंत्राटी पद्धतीने काम करणारे 206 कुशल आणि 1546 अकुशल कामगार, आरोग्य विभागाकडील 232 कर्मचारी त्याचप्रमाणे शिक्षण विभाग, उद्यान विभाग, पाणीपुरवठा विभाग, मलनिस्सारण विभाग या ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाNयांना होणार आहे. याशिवाय वेतन त्रुटी दूर करण्याचा, सहाव्या वेतन आयोगानुसार विविध भत्ते लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेवर जवळपास 100 कोटींचा बोजा पडणार आहे. पालिका कर्मचाNयांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना नेहमीच प्रयत्न करणार, असे यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले, तर कामगारहिताचे धडाकेबाज निर्णय घेतल्याबद्दल सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांचे कौतुक केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget