कराडच्या 100 फुटी रस्त्याची अधिसूचना रद्द


कराड (प्रतिनिधी) कराड शहरातील दत्त चौक ते ते बैल बाजार रोड कराड नगरपालिका हद्दीपर्यंत शंभर फुटी करण्याचे अधिसूचना नगर विकास विभागाने जारी केली होती. ही अधिसूचना रद्द करून दत्त चौक ते स्व. दादासाहेब उंडाळकर पुतळ्यापर्यंत 100 फूट ऐवजी 50 फूट तर उंडाळकर पुतळ्यापासून पुढे नगरपालिकेची हद्द संपेपर्यंत 100 फूट ऐवजी 60 फूट रुंदीकरण करण्याची नवीन अधिसूचना नगर विकास विभागाने सोमवार, दि. 5 रोजी जारी केली. 100 फूट रस्त्याविरोधी कराडकरांनी उभारलेल्या संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून उभारलेल्या लढ्याला या अध्यादेशामुळे यश आले. 

यामुळे नागरिकांनी संघर्ष कृती समितीचे विशेष कौतुक केले. 
कराड शहराच्या 2014 मध्ये मंजूर झालेल्या सुधारित विकास आराखड्याचे अनुषंगाने दत्त चौक ते मार्केट यार्ड गेट नंबर एक पासून कराड नगरपालिकेच्या हद्दीपर्यंत 30 मीटर म्हणजेच 100 फूट नियोजित रस्ता करण्यात आला होता. या भागातून जाणारी वाहतूक लक्षात घेता इतक्या मोठ्या रस्त्याची आवश्यकता याठिकाणी नसल्याने तसेच या रस्त्यामुळे अनेकजणांना आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागणार होता. यामुळे या रस्त्याला या परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध होता. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये कराड नगरपालिकेने नागरिकांच्या व संघर्ष कृती समितीच्या मागणीनुसार 100 फूट रस्ता रुंदीकरणाचा आराखडा रद्द करून त्याऐवजी दत्त चौक ते दादासाहेब उंडाळकर पुतळ्यापर्यंत 50 फूट व म्हणजे उंडाळकर पुतळ्यापासून शेवटपर्यंत 60 फूट रुंदीकरण करण्याचा ठराव नगरविकास खात्याकडे देऊन कराड शहराचा सुधारीत विकास आराखडा दुरुस्त करण्याची मागणी केली होती. सर्व प्रशासकीय सोपस्कर पूर्ण करून सोमवारी नगर विकास विभागाने दत्त चौक ते दादासाहेब उंडाळकर पुतळ्यापर्यंतचा रस्ता 50 फूट व तिथून पुढील रस्ता सात फूट रुंद करण्याच्या सुधारित आराखड्याच्या अध्यादेश जारी केला.

शंभर फुटी रस्ता रद्द करून नवीन 50 व 60 फूट रुंदीकरणाच्या प्रस्तावासाठी विशेष सहकार्य करणारे राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून ना. डॉ. अतुल भोसले, ना. शेखर चरेगावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच कराडच्या नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी संघर्ष कृती समितीला बहुमोल सहकार्य केले त्यामुळेच कराडकरांच्या मानगुटीवरील 100 फुटी रस्त्याचे भूत उतरू शकले. लोकशाही आघाडीचे नेते सुभाष पाटील यांनी या रस्त्याच्या प्रश्न संघर्ष कृती समिती स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्यामुळेच संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली. या समितीला रेठरे गावचे सेवानिवृत्त अभियंते शेखर चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच माजी नगरसेवक महादेव पवार कृती समितीचे प्रदीप सुखदेव विजय गाढवे, जनार्दन जगताप यांनी मेहनत घेतली . यासाठी कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी सहकार्य केले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget