10 नोव्हेबर रोजी खामगावातून काँग्रेसच्या जनसंपर्क अभियान यात्रेचा शुभारंभ


खामगाव,(प्रतिनिधी): केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या काळात संपूर्ण देशात भय, भ्रष्टाचार व अत्याचाराची मालीका सुरु झाली आहे. संपूर्ण देश अस्थिर करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारने केले आहे. भाजपा सरकारच्या अत्याचाराची माहिती घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाणा जिल्हाभर जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. शनिवार दि. 10 नोव्हें. 2018 रोजी खामगांव येथील गांधी चैक येथे सकाळी 10 वाजता भव्य जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.

याप्रसंगी अ. भा. काँग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार डॉ.वजाहत मिर्झा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड.गणेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय राठोड, महिला प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सौ. जयश्रीताई शेळके, डॉ.सौ. तबस्सुम हुसैन, अकोल्याचे माजी महापौर तथा बुलडाणा जिल्हा प्रभारी मदन भरगड ,माजी जिल्हा अध्यक्ष विजयभाऊ अंभोरे बुलडाणा जिल्हा महिला अध्यक्षा ज्योतीताई ढोकणे, उपाध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने यांचेसह बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. तसेच बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जनसंपर्क यात्रा खामगांव मतदार संघ निरीक्षकपदी सुनील सपकाळ, कासम गवळी यांची नियुक्ती करण्यात आली असुन ते सुध्दा जनसंपर्क अभियानासाठी उपस्थित राहणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर जनता तीव्र नाराज आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून शेतकरी, शेतमजूर, व्यापारी सोबतच सर्व घटक सरकारमुळे त्रस्त झाले आहेत. दुष्काळ सदृश्य परिस्थिती, मंदीसदृश्य वातावरण यामुळे मोठया प्रमाणात महागाईचा भडका झाला आहे. नोटबंदीच्या निर्णयाने उद्योग व्यवसायाची विस्कटलेली घडी व त्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी, उद्योजक व व्यावसायीकांची सरकारच्या धोरणामुळे पिछेहाट या सर्व बाबींचा जनसंवाद अभियान यात्रेच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन प्रत्येक घटकांशी संवाद साधून मोदी व फडणवीस सरकारच्या खोट्या आश्‍वासनांचा पर्दाफाश करुन शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, तरुण बेरोजगार,महिला भगिणी व नागरिकांच्या समस्या जाणुन घेऊन त्या समस्या आपल्या समजून समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget