Breaking News

जिल्‍हयातील 11 तालुक्यात दुष्‍काळसदृश्‍य परिस्थिती नागरिकांसाठी शासनाच्‍या विविध सवलतीचा लाभ


        अहमदनगर दि.31 – जिल्‍हयातील 11 तालुकयात दुष्‍काळसदृश्‍य परिस्थिती राज्‍य शासनाने जाहीर केली असून या तालुक्यातील नागरिकांना दुष्‍काळी परिस्थितीत शासनाने विविध सवलती लागू केल्‍या असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.
            जिल्‍हयातील जामखेड, कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव आणि श्रीगोंदा या तालुक्‍यात दुष्‍काळसद्श्‍य परिस्थिती जाहीर करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार या तालुक्‍यात जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्‍या वसूलीस स्‍थगिती. कृषी पंपाच्‍या चालू वीज बिलात 33.5 टक्के सवलत, शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थ्‍याच्‍या परीक्षा शुल्‍कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्‍या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्‍यक तेथे पिण्‍याचे पाणी पुरविण्‍यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्‍या गावात शेतक-यांच्‍या शेतीच्‍या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदि सवलती दिल्‍या जाणार आहेत.
            संबंधीत विभागांनी या सवलतीची अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्‍हाधिकारी श्री द्विवेदी यांनी दिले आहेत.