दिवाळी अंकाचा प्रवास 111 व्या वर्षात पदार्पण


श्रीरामपूर/प्रतिनिधी
दिवाळी अंकाचा प्रवास यावर्षी 111 वे वर्षात पदार्पण करत आहे. वाचक प्रिय, बुध्दवंताची वैचारीक समृध्दी वाढवण्यसाठी भुक भागवण्याचे काम होते ते दिवाळी अंकाने. मराठी वाड्मयीन विश्‍वात तर दिवाळी अंकानी साहित्यीकाच्या अनेक पिढ्या घडवल्या. अशा दिवाळी अंकाचा प्रवास 111 वर्षचा होत आहे. महाराष्ट्रात तब्बल तीन हजार अंक दरवर्षी प्रकाशीत होतात. ई-दिवाळी अंकाना ही मागणी वाढत आहे. असे प्रकारचे 350 ते 400 प्रकारचे दिवाळी अंक बाजारात दाखल झाले असल्याचे सर्ववृत्तपत्रांचे प्रमुख वितरक किशोर पांडे व विजय पांडे यांनी दिली. वाचक, लेखक, प्रकाशक, कामगार अशी सर्वांची पिढीच्या पिढी दिवाळी अंकांनी बांधून ठेवली आहे. मात्र, यंदा प्रमुख अंकांनी घसघशीत वाढ केल्याने वाचकांना उत्तमोत्तम साहित्य वाचण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दिवाळी अंकाच्या किमंतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाले असले तरी त्यांचा वाचक आजही कायम टिकुण असल्याचे पांडे यांनी सांगितले.

दिवाळी पुर्वी प्रत्येकजन फराळाबरोबरच साहित्याच्या फराळाची आतुरतेने वाट बघत असत याच दिवाळी अंकाना 111 वर्षाची परंपरा लाभली असल्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीत दिवाळी अंकाचे योगदान अमुल्य असे आहे. दिवाळी म्हटले की, फटाके, रांगोळ्या,फराळाचे सजलेले ताट या यादितच वाचन प्रेमी दिवाळी अंकांच्या मेजवाणीने अक्षर दिवाळी साजरी करतात. आपल्याला अभिप्रेत दिवाळी अंक हाती पडावा यासाठी वाचकांची दिवाळीच्या उत्सुकतेने वाट पाहतात. विविध विषयाचे दिवाळीअंक बाजारात आले आहे. भारतात बंगली भाषा सर्वाधिक बोली जाते .रविंद्रनाथ टोंगोर, सुनिल गंगोपाध्ङ्माङ्म आदि साहित्ङ्मांकानी समृध्द केलेल्या बंगाली भाषेतुन बंगाली भाषेतुन दिवाळी अंकाची संकल्पना पुढे आली. दैनिकांमधिल लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक सकाळ, लोकमतचा दिपोत्सव, केसरी, सामना, पुढारी याच बरोबर साप्ताहिक साहित्यामध्ये मार्मिक, चित्रलेखा, लोकप्रभा यांची दिवाळी अंकांत वेगवेगळया विषयांची मांडणी केली आहे. शेतीविषयक, गोडवा, बळीराजा, अ‍ॅग्रोवन, उद्योजक यांचे दिवाळी अंक बाजारात आले आहे. विनोदी अंकांचा बादशाह आवाज, जत्रा, हास्यरंग, आक्रोश, कॉमेडीकट्टा, मराठी पत्रकार आवाज, हासवंती, फिरकी, शामसुंदर हे अंकंही आले आहेत. तसेच आरोग्यासाठी शतायुषी, दिर्घायु, घरचा वैद्य, डायबेटीज मित्र, आरोग्य ज्ञानेश्‍वरी हे अंकंही आले आहेत. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget