Breaking News

श्रीक्षेत्र सरला बेटला 11 हजार दिव्यांचा दीपोत्सव


श्रीरामपुर/प्रतिनिधी
भारतमातेच्या रक्षणार्थ लढणार्‍या वीर जवानांच्या दीर्घायुष्यासाठी सदगुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या चरणी, दीपावली पाडवानिमित्त श्री क्षेत्र सरला बेट येथे महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी 8 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता 11 हजार दिव्यांचा भव्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज, सदगुरु ब्र. नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत सद्गुरू रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत, सदगुरु योगीराज गंगागिरी महाराज भक्त मंडळाच्या वतीने 11 हजार दिव्यांचा दिपोस्तव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतमातेच्या रक्षणार्थ लढणार्‍या आजीमाजी सैनिकांनी, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सदगुरु योगीराज गंगागिरीजी महाराज भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.