Breaking News

चिपळूण येथे एजीएफसीचे 13 वे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन


कराड/प्रतिनिधी
चिपळूण येथे एजीएफसीचे दि.13 व 14 नोव्हेंबर या कालावधीत 13 वे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन होणार आहे. ऑल इंडिया जर्नालिस्ट ऍण्ड फे्ंरड सर्कल या पत्रकार संघटनेने राज्यस्तरीय संमेलन चिपळूण येथे आयोजित केले आहे. या संमेलनात महाराष्ट्रातीेल सर्व माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत अशी माहिती संघटनेचे केंद्रीय सचिव अतुल होनकळसे यांनी दिली. चिपळूण येथे होणार्‍या पत्रकारांच्या राज्यस्तरीय संमेलनाला वेगवेगळया भागातून सुमारे 500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पत्रकारांच्या हक्काधिकाराचे विषय संमेलनात घेण्यात येणार आहेत. अनेक विषयांवर संमेलनामध्ये चर्चा होणार आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकारांच्या दृष्टीने महत्वाचे अनेक विषय हाताळण्यात येणार आहेत. संमेलनात राज्यातील 36 जिल्हयातून इलेक्ट्रॉनिक्स, मुद्रीत माध्यमांचे 500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या संमेलनामध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या संमेलनामध्ये राज्यभरातील पत्रकारांचा समावेश आहे. दि. 14 नोव्हेंबर रोजी संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात पत्रकार क्षेत्रामधील मोठे योगदान व स्तुत्य काम करणार्‍या राज्यातील पत्रकारांना राज्यस्तरीय व केंद्रीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. अनेक जेष्ठ पत्रक ारांसह नामवंत मंडळीच्या उपस्थितीत पुरस्कारांचे शानदार वितरण होणार आहे. या संमेलनाला केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल, उपाध्यक्ष नितीन भागवत, केंद्रीय खजिनदार राजेंद्र शिंदे, प्रदेशाध्यक्ष विकास कुलकर्णी, सतिश कदम यांच्यासह केंद्रीय व प्रदेश कार्यकारीणीतील पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे अतुल होनकळसे यांनी सांगितले.