Breaking News

13 जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला ठार करण्यात अखेर वनविभागाला यश


गेल्या दीड वर्षापासून 13 जणांचा बळी घेणाऱ्या टी-1 वाघिणीला ठार करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. वनविभागाच्या शोध पथकाला शुक्रवारी रात्री टी-1 वाघिणी दिसली. तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू होते. तिनं शोध पथकाच्या दिशेनं हल्ला केला. 

अखेर शार्प शूटर अजगर अलीनं गोळ्या झाडून तिला ठार केलं. रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती वन विभागाच्या सुत्रांनी दिली. बोराटीच्या जंगलात या वाघिणीला ठार करण्यात आले. वाघिणीचा पंचनामा करून तिच्यावर लवकरच शवविच्छेदन करण्यात येणार आहे. तिला नागपुरात हलवण्यात आलेआहे.