स्वाभिमानी शे.संघटनेचे 13 ला उपोषण

शेवगाव/प्रतिनिधी             
शेवगाव तालुक्यातील वरूर  या गावांमधून जाणारी नानी या नदीवर जलसंधारण विभागाने अतिशय संथगतीने व निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून शासनाला  व लाभधारक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक व दुष्काळाला सामोरे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
            या बंधार्‍याचे काम गेल्या दोन वर्षांपासून चालू असून आणखी हे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी दिनांक 13  नोव्हेंबर रोजी बंद उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आशयाचे निवेदन शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांना देण्यात आले आहे. या  बंदराच्या ठेकेदाराने आठ दिवसातच काम सुरू करू असे समस्त गावकर्‍यांसमोर सांगितले परंतु अद्याप पर्यंत आठ महिने होत आहेत. तरीही या  बंधार्‍याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. होऊन गेलेल्या पावसाळ्यामध्ये या बंधार्‍याचे मोठे नुकसान पहिल्याच पावसात झाले होते,बंधार्‍यांचा काही  भाग या पावसाळ्यात वाहून गेल्यामुळे या बंधार्‍याच्या कामाबाबत शंका निर्माण झाली आहे. शासनाचा पैसा पाण्याबरोबर वाहून गेल्याची भावना  लाभधारक क्षेत्रातील शेतकर्‍यांची झाली आहे, या बंधार्‍याच्या कामाबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी अशीही मागणी यावेळी गावकर्‍यांनी केली  आहे. यावेळी निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, शहर अध्यक्ष  दत्तात्रेय फुंदे, प्रवीण मस्के, रवी वावरे, विकी खैरे, भाऊ मस्के, सुरेश वावरे, बनेखा पठाण या मान्यवरांच्या या निवेदनावर आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget