Breaking News

सहकारचा 14 वर्षाखालील क्रिकेट संघ राज्यस्तरावर


बुलडाणा,(प्रतिनिाी): महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे द्वारा आयोजित विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सहकार विद्या मंदिरच्या 14 वर्षाखालील क्रिकेट संघाने विजय संपादन करुन राज्यस्तरावर झेप घेतली आहे. पांढरकवडा येथे झालेल्या विभागीय स्तरावर कर्णधार मो.सरजील शेख याने पृथ्वी शिंदेंच्या साथीने कर्णधाराला साजेशी खेळी करत अकोला,अमरावती संघावर एकतर्फी मात करत आपल्या संघाला राज्यस्तरावर पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले. तसेच संघाचे यश तरमळे,अंशुल दिनोदे, मिरान पठाण, प्रज्ज्वल गट्टाणी यांनी साथ दिली.

खेळाडूंनी वर्षभर केलेल्या मेहनतीमुळेच तसेच सहकार विदया मंदिरने पुरवलेल्या क्रिकेटच्या सर्व सोयी सुविधांमुळेच आपला संघ राज्यस्तरावर पोहोचल्याचे प्रशिक्षक राजु ढाले यांनी व्यक्त केले. संघाच्या यशाबद्दल बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, मुख्य कार्यकारी संचालक डॉ.सुकेश झंवर,अध्यक्षा कोमल झंवर, प्राचार्य अलगर सामी व बुलडाणा क्रिकेट कमेटीच्या सदस्यांनी कौतुक केले आहे. या संघात मिरान पठाण, कर्णधार सरजील शेख,पृथ्वी शिंदे, योगेश भुसळकर, प्रज्ज्वल गट्टानी, सुजल देवकर, जयेश कुटे, श्रीनंद साबळे, आनंद टाले, यश तरमळे, मन दळवी, तनीष्क विज,अघवेद बिल्लानी,अंशुल दिनोदे, आदित्य मेहरे, पीयूष घुसळकर, मोहम्मद हुजीफ, युनुस शेख आदींचा संघात सहभाग होता.