फरेरांचा पुणे पोलिसांवर मारहाणीचा आरोप; कोरेगाव भीमा हिंसाचार; सुधा भारद्वाजसह अन्य आरोपींना 14 दिवसांची कोठडी

पुणे (प्रतिनिधी)ः कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले आरोपी अरुण फरेरा यांनी आपल्याला पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान मारहाण झाल्याचा आरोप न्यायालयात केला. या मारहाणीनंतर आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि वर्नन गोन्साल्विस या तिघांना पुणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तत्पूर्वी त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते.

फरेरा यांच्यासह अन्य् आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात आणण्यात आले. त्या वेळी फरेरा यंनी सांगितले, की चार नोव्हेंबर रोजी पुणे पोलिसांच्या कोठडीत चौकशी दरम्यान पोलिसांनी आपल्या 8-10 वेळा कानशिलात लगावल्या. अशा प्रकारे गंभीर मारहाण केल्यानंतर दुसर्‍या दिवशी 5 नोव्हेंबर रोजी मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा जबाब फरेरा यांनी इनकॅमेरा न्यायाधीशांसमोर नोंदवला. चार तारखेला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा जबाब न्यायाधीशांसमोर कलम 164नुसार नोंदविण्याची मागणी फरेरा यानी केली होती; मात्र न्यायालयाने त्यांचा 164 नुसार जबाब न नोंदविता त्यांचे म्हणणे इनकॅमेरा मांडण्याची संधी दिली.

मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमधून फरेरा यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुंबई मानवाधिकार चळवळीतील ते महत्त्वाचे नेते मानले जातात. 2007 मध्ये फरेरा यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा ठपका ठेवत अटक करण्यात आली होती; मात्र सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली होती. पोलिसांनी त्यांना 11 प्रकरणांमध्ये आरोपी केले होते. 2011 मध्ये पुन्हा एकदा त्यांना अटक करण्यात आली होती;पण त्यांची जामिनावर सुटका झाली होती. 2016 मध्ये फरेरा यांनी सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ते सध्या वकील म्हणूनही काम करतात.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget