अ.भा. मराठा महासंघ व शेतकरी मराठा महासंघाच्या वतीने शनी शिंगणापुरला दि.15 नोव्हेंबर रोजी शेतकरी वारकरी राज्यस्तरीय महासंमेलनाचे आयोजन


अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र शनी शिंगणापुर येथे होणार्‍या राज्यातील पहिले शेतकरी वारकरी राज्यस्तरीय महासंमेलनाच्या नियोजनार्थ नगर मधील शासकीय विश्राम गृह येथे अ.भा. मराठा महासंघ व अ.भा. शेतकरी मराठा महासंघाची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे राज्य संयुक्त चिटणीस दिलीप दादा जगताप व आयोजक संभाजी दहातोंडे उपस्थित होते

गुरुवार दि.15 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर राष्ट्रीय संत ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली या संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. यावेळी शेतकरी व वारकरी महासंमेलनाचे निमंत्रक समितीचे ह.भ.प. अनिल महाराज वाळके, उध्दव महाराज मंडलिक, संतोष नानावटे, मनोहर वाडेकर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव डौले, सचिव रमेश बोरुडे, गंगाधर बोरुडे, शहराध्यक्ष अनिकेत कराळे, अहिलाजी दराडे, अ‍ॅड.साईराम बानकर, शामराव पवार, नगर तालुकाध्यक्ष पै.नाना डोंगरे, गणेश नाईकवाडे, बिभीषण खोसे, ज्ञानेश्‍वर फसले, संतोष हंबर, दत्ता शिंदे, कल्पेश भुई, रत्नेश वैरागी, अनिल सोनवणे, राम महाराज उदागे, धनवट महाराज आदी उपस्थित होते.
संभाजी दहातोंडे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी व वारकरी हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. जे शेतकरी आहेत तेच वारकरी असल्याने या संमेलनासाठी दोन्हींच्याही समस्यांवर चर्चा होणे बर्‍याच वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी महाराष्ट्रामध्ये पहिले भव्य राज्यस्तरीय महासंमेलन होत आहे. नेवासा तालुका ही साधू संतांची पुण्यभूमी असून, ज्ञानेश्‍वर महाराजांनी ज्ञानेश्‍वरी ग्रंथाची या ठिकाणी रचना केली. तसेच श्री क्षेत्र शनी शिंगणापुर जगाच्या नकाशावर आनण्यासाठी स्व.बाबुराव पा. बानकर यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत. मराठा महासंघातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय राष्ट्रसंत तनपुरे बाबा मराठा भूषण पुरस्कार समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रदान केला जातो. यंदाचे 15 वे वर्ष असून यावेळी राज्यातून विविध क्षेत्रातून अनेक कर्तुत्ववान व्यक्तींच्या नावाची शिफारसी महासंघाकडे आलेल्या आहेत. महासंघाची निवड समिती निकषांची पडताळणी करून लवकरच पुरस्कार जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या संमेलनामध्ये डॉ.स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे, शेतकर्‍यांच्या शेतीमालास हमी भाव मिळणे, श्री क्षेत्र नेवासा येथे संत विद्यापीठाची स्थापना करणे, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यामध्ये विभागवार वारकरी शिक्षण संस्थांना मान्यता देणे, शेतमाल निविष्ठा नियामक मंडळ स्थापन करण्याबाबत चर्चा होणार आहे. अशाच प्रकारचे विभागीय महासम्मेलन राज्यातील पाच विभागात घेतले जाणार असून, त्यामध्ये विभागावर शेतकरी, वारकर्‍यांच्या विविध समस्यांवर चर्चा घडवून आनली जाणार आहे. या महासंमेलनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, संबंधीत मंत्री, आमदार, खासदार, शेतकरी संघटनांचे प्रमुख, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार-प्रवचनकार तसेच मराठा महासंघाचे राज्यातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget