Breaking News

स्वाभिमानीच्या दणक्याने 15 गावातील शेतकर्‍यांना मिळाले ट्रान्सफार्मर राणा चंदन यांच्या प्रयत्नांना यश, शेतकर्‍यांची अडवणूक करू नका: राणा चंदनबुलडाणा : (प्रतिनिधी) मागील आठवडयात स्वाभिमानीचे नेते राणा चंदन यांच्या प्रयत्नाने जिल्हयातील 15 गावांना ट्रान्सफार्मर मिळाले. त्यामुळे अनेक गावातील शेतकर्‍यांच्या रब्बी पिकाला पाणी देण्याचा प्रश्‍न् मार्गी लागला. सध्या शेतकर्‍यांचा रब्बीचा हंगाम सुरू आहे. गहू, हरभरा, मका व भाजीपाल्याचे पिकाची शेतकर्‍यांनी लागवड केली आहे. मात्र ऐन पिकांना पाणी देण्याची वेळ असताना विज वितरण कंपनीचे अनेक ठिकाणचे ट्रान्सफार्मर जळाल्याच्या घटना घडत आहेत एकदा ट्रान्सफार्मर जळाले की, ते शेतकर्‍यांना लवकर मिळत नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतकर्‍यांचे पिक सुकू लागले आहेत. परिणामी शेतकरी त्रस्त् झाले असून वारंवार मागणी करूनही शेतकर्‍यांना ट्रान्सफार्मर मिळत नव्हते. विज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकर्‍यांना दाद देत नाहीत. अशावेळी शेतकरी आपली तक्रार घेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांचेकडे धाव घेतात. प्रत्येक वेळी स्वाभिमानीकडे आलेल्या शेतकर्‍यासोबत विज वितरन कंपनीच्या कार्यालयात जावून अधिकार्‍यांसमोर शेतकरर्‍यांच्या व्यथा मांडून ट्रान्सफार्मर मिळवून देण्याचे काम राणा चंदन यांनी केले आहे.

मागील आठवडयांत राणा चंदन यांनी भादोला, वाडी, वरवंड, खुपगाव, किन्होळा, रोहणा, केसापूर, रायपूर, पेनसावंगी, आरेगाव, कणका, शिवणी आरमाळ, साखरखेर्डा, माळवंडी, सव आदी गावांना ट्रान्सफार्मर मिळवून दिले. त्यामुळे या गावातील शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांना पाणी देण्याचा प्रश्‍न् निकाली निघाला आहे. पावसाअभावी खरीपाचा हंगाम शेतकर्‍यांच्या हातून गेला आहे. कसाबसा रब्बीचा हंगाम हाती लागत असतांनाच विज वितरण कंपनीच्या आडमुठया धोरणामुळे रब्बीलाही धोका निर्माण झाला होता. मात्र स्वाभिमानीमुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. विज वितरण कंपनीने शेतकर्‍यांची अडवणूक न करता शेतकर्‍यांना त्वरीत ट्रान्सफार्मर उपलब्द् करून दयावे अन्यथा स्वाभिमानी शेतकर्‍यांना सोबत घेवून मोठया प्रमाणावर आंदोलन छेडतील असा इशारा राणा चंद्रशेखर चंदन यांनी दिला