हिवाळी अधिवेशन प्रथमच मुंबईत 19 तारखेपासून प्रारंभ; सुटीच्या दिवशीही कामकाज


मुंबई- नागपूरऐवजी मुंबईत हिवाळी अधिवेशन होणार आहे. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतल्याने आता हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. हे अधिवेशन दोन आठवडे चालणार आहे. 19 ते 30 नोव्हेंबर या कार्यकाळात अधिवेशन घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गुरुनानक जयंतीच्या दिवशीही कामकाज सुरूच राहणार आहे.

दुष्काळासह राज्यातील अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केले असून, त्यावर विस्तृत चर्चेसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान तीन आठवड्यांचा असायला हवा होता. मात्र ही चर्चा टाळण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचे केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर विखे यांनी ही प्रतिक्रिया दिली. विखे पाटील म्हणाले, की, राज्यात दुष्काळाची स्थिती भयावह झाली आहे. दुष्काळ निवारणासाठी सरकारकडून पुरेशी तयारी झालेली नाही. मागील दोन दुष्काळांमध्ये हे सरकार दुष्काळी उपाययोजनांनी योग्य अंमलबजावणी करू शकले नाही, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांसह शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीत सरकारला आलेले अपयश, मराठा, मुस्लीम, धनगर आदी समाजांच्या आरक्षणाच्या मागणीबाबत सुरू असलेला वेळकाढूपणा, मुंबईचा विकास आराखडा व राज्यातील इतर नागरी समस्यांवर विरोधी पक्षांना सभागृहात चर्चा करायची आहे. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी किमान एका आठवड्याने वाढवून तीन आठवड्यांचा करावा, अशी मागणी आम्ही केली; मात्र जनतेचे प्रश्‍न मांडताना विरोधी पक्ष आक्रमक होऊन सरकार कोंडीत फसण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने जाणीवपूर्वक अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यास नकार दिपश.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget