पुण्यात 200 पेक्षा अधिक झोपडया जळून खाक शिवाजीनगरच्या पाटील इस्टेटमध्ये भीषण आग

पुणे : शिवाजीनगरच्या वाकडेवाडी येथील पाटील इस्टेटच्या गल्ली क्रं. 3 मध्ये लागलेल्या भीषण आगीत 200 पेक्षत्त अधिक घरे जळून खाक झाली आहेत. आग लागली असून ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. इस्टेटमधील आग आटोक्यात आण्ण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आगीचे रौद्ररुप पाहता पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातून अग्निशमन दलाच्या अग्निशमन दलाच्या 40 गाड्या मागवाव्या लागल्या. झोपडीतील सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. सहा वर्षापूर्वी देखील अशीच घटना याच ठिकाणी घडली होती. पाटील इस्टेट झोपडपट्टीत जवळपास 400 घर आहेत. संपूर्ण झोपडपट्टी रिकामी करण्यात आल्याची माहिती आहे. पुणे-मुंबई मार्गावर ही पाटील इस्टेट झोपडपट्टी आहे. सहा ते सात सिलेंडरचे स्फोट झाल्यामुळे आग आणखी भडकली. धुराचे मोठ मोठे लोट आकाशाच्या दिशेने उठताना दिसत आहेत.
आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अजूनही सुरु आहे. संगमवाडी ब्रीज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून सिलेंडरच्या गळतीमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे. 50 हुन अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. या वसाहतीच्या एका बाजूला नदी वाहते असून दुसर्‍या बाजूने अंदाजे 500 हुन अधिक मीटर अंतरावर घरे आहे. आत जाणारा रस्ता खूपच छोटा असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना आत जाता येत नाही आहे. पाईपद्वारे पाणी नेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतर नागरिक आपल्या घरातील वस्तू बाहेर काढून घेऊन जाताना दिसत आहेत. अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाला पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत. वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलीस घटनास्थळावरील गर्दीला आवरण्याचा प्रयत्न करत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget