Breaking News

लग्नात जेवल्याने 23 जणांना विषबाधामुंबई: (प्रतिनिधी)ः वांद्रे पूर्वे येथील समाज मंदिर हॉलमध्ये एका लग्न समारंभात भोजनानंतर 23 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्वांना तात्काळ व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. विषबाधा झालेल्यांमध्ये 11 पाहुण्यांचा समावेश आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. 

लग्न समारंभात भोजनानंतर 23 जणांना अचानक उलट्या आणि मळमळ सुरू झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये 11 पाहुणे आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. तीन लहान मुले आणि आठ महिलांवर अद्यापही उपचार सुरू असून बाकीच्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.