Breaking News

महाराष्ट्र हे उत्पादन निर्मिती व संशोधनाचे केंद्र मुख्यमंत्री फडणीस यांचे मत; महाराष्ट्रातील 2 हजार लोकांना रोजगार


पारनेर, (प्रतिनिधी)- सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले ॠमेक इन इंडिया’च्या माध्यमातून महाराष्ट्र हे उत्पादन निर्मिती व संशोधनाचे केंद्र बनणार आहे. ॠमाइडिया ग्रुप’च्या माध्यमातून दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी व्यक्त केला.

सुपे येथील औद्योगिक वसाहतीत ॠमाइडिया फौंडेशन’च्या वतीने 1 हजार 350 कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ फडणीस यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री सुभाष पोटे, खासदार दिलीप गांधी, आमदार विजय औटी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार शिवाजीराव कर्डिले, सतीश गौरी, एमआयडीसीचे सीईओ पी अन्बलगन, ॠमीडिया ग्रुप’चे संस्थापक शिंगजियान, अध्यक्ष पॉल फंग, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, तालुकाध्यक्ष विश्‍वनाथ कोरडे, सरचिटणीस सुनील थोरात, वसंतराव चेडे, सुभाष दुधाडे, महिला तालुकाध्यक्ष अश्‍विनी थोरात, स्मिता तरटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व उद्योगांसाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे उद्योगासाठी व गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे पसंतीचे ठिकाण बनले आहे. या टेक्नॉलॉजी पार्कमध्ये गृहपयोगी उपकरणे, एअरकंडिशन व कॉम्प्रेसरची उत्पादने घेतली जाणार आहे. सुपे औद्योगिक वसाहतीतील 68 एकर परिसरात हा प्रकल्प उभा केला आहे. 
जगातील सर्वात मोठा प्रकल्प या ठिकाणी होत असल्याचे समाधान मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. कंपनीने महाराष्ट्रतील सुपे औद्योगिक वसहतीत नवा अध्याय सुरू केला आहे. या कंपनीला चांगल्या सोयी सुविधा पुरवून चायनीज क्लस्टर याठिकाणी चालू करणार आहे. महाराष्ट्रात विदेशी कंपन्यांना गुंतवणकीसाठी मोठा वाव असून विदेशी कंपन्यांची पावले महाराष्ट्रकडे वळली आहेत, असे ते म्हणा्ले. 
देसाई म्हणाले, की जपानबरोबर चीनही या ठिकाणी नवीन उद्योग आणण्यास तयार आहे. यामुळे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे. या उद्योगामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. त्यामुळे जपानप्रमाणे इतर अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. 
या वेळी या ॠमाइडिया कंपनी’चे व्यवस्थापक संचालक कृष्णराव सुखदेव म्हणाले, की ॠमेक इन इंडिया’च्या माध्यमातून महत्वपूर्ण बाजारपेठेतील भागीदारी भक्कम होणार आहे. त्यामुळे आमच्या समूहाचा हा दुसरा कारखाना करियर बॅडसाठी महत्वपूर्ण आहे. 
.या वेळी खा. गांधी यांचेही भाषण झाले. 
 
सुप्यात साडेतेराशे कोटींची गुंतवणूक

फडणीस म्हणाले, की सुपे येथील औद्योगिक वसाहतीत ॠमीडिया ग्रुप’च्या वतीने जे पार्क सुरू करण्यात आले आहे, त्यासाठी 1 हजार 350 कोटी रुपयांची गुंतवणुक या कंपनीने केली आहे.