भारिप बहुजन महासंघाचा 5 नोव्हेंबरला आक्रोश मोर्चा


जळगाव जामोद,(प्रतिनिधी): शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी 5 नोव्हेंबर रोजी 12 वाजता भारिप बहुजन महासंघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, रोजगार हमीचे कामे त्वरित सुरु करण्यात यावे, शेतकर्‍यांचा सातबारा सरसकट कोरा करण्यात यावा, शेतकर्‍यांना 24 तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी व सुरु असलेले लोड शेडिंग बंद करण्यात यावी, अतिक्रमित घरकुल लाभार्थ्यांना ते राहत असलेल्या जागेवर घरकुल बांधून देण्यात यावे, अतिक्रमित शेत जमिनीचे पट्टे अतिक्रमण धारकांना देण्यात यावे, पीक विमा काढलेल्या शेतकर्‍यांचा पीक विमा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा, शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये दुष्काळी नुकसान भरपाई देण्यात यावी, मुद्रालोन, जिल्हा उद्योग, महात्मा फुले, खादी ग्राम उद्योग व इतर महामंडळाचे मंजूर झालेले अनुदान वाटप करण्यात यावे, तालुका सामान्य रुग्णालय येथील रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक त्वरित करण्यात यावी व रुग्णांना औषध पुरवठा सुरळीत करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी 5 नोव्हेंबरला आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.

मोर्चाला दुपारी 12 वाजता भीमनगर येथून सुरुवात होणार आहे. मोर्चा माळी खेल, चावळी चौक, स्टेट बँक, दुर्गा चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. याबाबतचे निवेदन तालुकाध्यक्ष रतन नाईक कार्यकर्ते यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget