राष्ट्रीय महामार्ग 61 चे काम त्वरीत सुरू करा; सामाजिक कार्यकर्त्यांचा रास्ता रोको


पाथर्डी/प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गाचे 61 (222) चे फुंदे टाकळी ते मेहकरी फाटा बंद पडलेले काम त्वरित सुरू करून झालेल्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. यासाठी तालुक्यातील विविध पक्षाच्या पदाधिकारी व सामजिक कार्यकर्त्यांच्या वतीने बुधवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय महामार्गावरील नाईक चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी येळी गावचे सरपंच संजय बडे, सुभाष केकान, बजरंग घोडके, अरविद सोनटक्के, प्रा सुनिल पाखरे,भास्कर दराडे आदी जण उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी पुढे म्हटले की, ज्याने आंदोलनकर्त्याला फोन करून धमकावले असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी. आजपर्यंत या प्रश्‍नांवरती भरपूर आंदोलन झाले पण हा प्रश्‍न काही सुटला नाही. आजपर्यंत 71 लोकाना या रोडच्या कामामुळे जीव गमवावा लागला आहे. आता नुसते आंदोलन करून भागणार नाही तर यावर काही तरी ठोस निर्णय घेणें गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. 

तर आम आदमीचे किसन आव्हाड यांनी म्हणाले की, या रोडच्या कामामध्ये अनेक जणांना जीव गमवावा लागाला असुन तालुक्याला कोणी वाली उरला नसून लोकप्रतिनिधीचे तालुक्याकडे लक्ष नसल्याचे म्हटले. सामाजिक कार्यकर्ते हे सामाजिक प्रश्‍नासाठी आंदोलन करत असतात परंतु आज त्या प्रश्‍नाकडे व सामाजिक कार्यकर्तेकडे पाहण्याचा प्रशासनाचा दृष्टीकोन बदलत आहे. काही दिवसांपासून चुकीच्या पद्धतीने तालुक्यात खोटे गुन्हे दाखल होत आहेत. असे मत सुभाष केकान यांनी मांडले. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील हे आंदोलकर्त्यांच्या शिष्टमंडळ तहसिल कार्यलय येथे जाऊन महामार्गाच्या प्रतिनिधीकडून लेखी आश्‍वसन घेऊ व त्यानंतर त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर काम सुरु करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. रोडचे ठेकेदाराच्या प्रतिनिधींनी येत्या पंधरा दिवसांत रोडचे काम सुरू करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय आव्हाड, अरविंद चव्हाण, भगवान सानप, राहुल खेडकर, प्रवीण कुसळकर यांनी तसेच पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हफ्ते मागणार्‍याचे नाव समोर येऊ द्या...
तुम्हाला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल कोणता किंवा पुढारी हफ्ते मागत असेल तर आम्हाला सांगा तालुक्यासमोर त्याचे नाव येऊ द्या. आम्ही त्याचा बंदोबस्त करू हा प्रश्‍न कोणा एकट्याचा नसून पूर्ण तालुक्याचा आहे. आम्ही तुम्हाला वाटेल ती मदत करू. पण लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करा. 
सरपंच संजय बंडे

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget