खामगावमध्ये 75 हजारांची घरफोडी


खामगाव,(प्रतिनिधी): शहरातील बोबडे कॉलनी भागातील रहिवासी विजयकुमार चौधरी यांच्या घरातून मोबाइल चोरीच्या घटनेची शाई वाळत नाही तोच काल 39 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी टिळक भागात राहणार्‍या किलोलिया यांच्या घरातून चोरट्याने सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 75 हजार रुपयाचा माल लंपास केला. मागील काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्य चोरांचे की, पोलिसांचे असा प्रश्‍न उपस्थित केल्या जात आहे. 

सतत होणार्‍या चोर्‍यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या टिळक मैदान परिसरातील रहिवासी सौ. चंदा जगदिश किलोलिया वय 57 ही महिला काल 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास परिवारातील सदस्यासोबत मोठ्या देवीच्या दर्शनासाठी गेली होती. मोठ्या देवीसह अन्य देवीचे दर्शन घेवून रात्री नऊ वाजता घरी परत आली. यावेळी त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसून आला. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी घरात जावून पाहिले असता, घरातील कपाट सताड उघडे असलेले दिसून आले. दरम्यान चोरट्याने कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवलेली सोन्याची चैन, नेकलेस, पेंडॉल व पदक असा एकूण 75 हजार 720 रुपयाचा माल लंपास केला होता. त्यानंतर चंदा किलोलिया यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget