‘जायकवाडी’साठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाने विखे साखर कारखान्याची याचिका फेटाळली


अहमदनगर : नाशिक आणि अहमदनगरच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग बुधवारी मोकळा झाला. यासंदर्भात विखे साखर कारखान्याची याचिकाच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातील विविध धरणामधून 8 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

दुष्काळाअभावी मराठवाडयात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून, मराठवाडयातील सर्वपक्षीय नेत्याकडून जायकवाडी धरणांत अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतील पाणी सोडण्याची आग्रही भूमिका मांडली होती. तर दुसरीकडे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील जनतेकडून जायकवाडीला पाणी देण्याच्या निर्णयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
 
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील याचिका फेटाळत जायकवाडी धरणांत पाणी सोडण्याला हिरवा कंदील दाखवल्यामुळे, मराठवाडयातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. 
 चा दुरुपयोग केला जातो, असा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात विखे साखर कारखान्यांकडून करण्यात आला. पप्रवरा व उर्ध्व गोदावरी धरण समूहाच्या लाभक्षेत्रात या वर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिले, त्यातच शासनाने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केल्याने आगामी काळात लाभक्षेत्रातील गावांचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनण्याची शक्यता गृहीत धरून पाणी सोडण्यास स्थगिती देण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. जायकवाडी संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दाखल झालेली याचिका फेटाळून लावली. जायकवाडी धरण 65 टक्क्यांपेक्षा कमी भरल्यास समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार गोदावरी खोर्‍यातील गंगापूर, दारणा, पालखेड, प्रवरा, मुळा, भंडारदरा धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश आहेत. 


शेतकर्‍यांचा तीव्र विरोध 
राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता जायकवाडी धरणामध्ये 36 टक्के पाणीसाठी असून देखील नगर-नाशिकमधून पाणी सोडावे लागणार आहे. मात्र, यावरुन नगर- नाशिकमधील लोकप्रतिनिधी आक्रमक असून आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. त्याबद्दल त्यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. 

या धरणांमधून सोडणार पाणी 
मुळामधून 54 दलघमी (1.90 टीएमसी)
प्रवरामधून 109 दलघमी (3.85 टीएमसी)
गंगापूर धरणातून 17 दलघमी (0.60 टीएमसी)
दारणा धरणातून 57.50 दलघमी (2.04 टीएमसी)
पालखेड समुहातून 170 दलघमी (60 टीएमसी)
एकूण 254 दलघमी (8.99 टीएमसी) पाणी सोडणार 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget