राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा जमावाकडून निर्घृण खून


गाडीस कट लागलेल्या कारणावरून झालेल्या वादातून 11 ते 12 जणांनी तलवार, कोयत्यासह केलेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला. अंकुल उर्फ गोल्या श्रीधर चव्हाण (वय-25, रा.नाईकवाडी प्लॉट,बार्शी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी रात्री 8 च्या सुमारास उपळाई रोडवरील जनता बँकसमोर हा प्रकार घडला.
याप्रकरणी आकाश श्रीधर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंद माने, सुरज उर्फ सोन्या माने, रमेश माने सर्व रा.अलिपूर रोड बार्शी अमोल वायकुळे, अर्जून नागणे, (दोघे रा.पाटील प्लॉट शिवाजीनगर बार्शी), सागर माने, विजय उर्फ आबा किसन वाघ, दिपक माने (तिघे रा. अलिपूर रोड माऊली चौक बार्शी) या संशयितांविरोधात तसेच इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा शहर पोलिसात दाखल झाला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget