Breaking News

संकल्पमधील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ व कपड्यांची भेट


कुळधरण/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील राशीन येथील आदिवासी पारधी समाज विकास संस्था संचलित संकल्प वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कीर्तीदादा ओसवाल यांनी दिवाळी फराळ, कपडे भेट देवून शुभेच्छा दिल्या. वसतिगृहातील होतकरू विद्यार्थ्यांना मिळालेल्या अनोख्या भेटीने विद्यार्थी आनंदी झाले. दिया व अनिता या विद्यार्थिनींनी प्रवेशद्वारावरच फुले देऊन अनोखे स्वागत केलेे. ओसवाल यांनी प्रकल्पाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पायल आणि कृष्णा यांनी पाहुण्यांना इंग्रजीमधून प्रकल्पाची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या अंगावरील जुने कपडे पाहून ओसवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांना कपड्यांच्या दुकानात घेऊन यायला सांगितले. विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीचे कपडे निवडले. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांची कपड्याची खरेदी उरकली. सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी सचिव प्रणिता भोसले उपस्थित होत्या. विजय भोसले यांनी त्यांचे मानले.