कराडच्या युवतीवर प्राण घातक करणार्‍या युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न


कराड (प्रतिनिधी) : येथील शिवाजी स्टेडियमनजीकच्या झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीचा गळा चिरून आणि दोन्ही हाताच्या मनगटावर वार करून पसार झालेल्या संशयित युवकाने रविवार, दि. 4 रोजी रात्री वारूंजी फाटा परिसरात विष प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजय सुनील गवळी, असे त्याचे नाव आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला रविवारी रात्री कृष्णा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, व्हेटिंलेटर उपलब्ध नसल्याने श्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून त्याला सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
याबाबतची माहिती अशी, येथील शिवाजी स्टेडियमनजीकच्या झोपडपट्टीतील एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचे तोंड दाबून गळ्यावर आणि दोन्ही हाताच्या मनगटावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली होती. या खुनी हल्लयात ती मुलगी गंभीररित्या जखमी झाली. त्याच अवस्थेत तिला कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मुलीच्या आईने रविवारी रात्री उशीरा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे की, अजय सुनील गवळी हा शाळेत येता-जाताना रस्त्यात अडवून त्रास देत असल्याचे मुलीने एक-दोनदा सांगितले होते. मात्र, इभ्रतीपोटी आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. रविवारी (दि. 4) मी धुण्याभांड्याच्या कामाला गेले असताना दुपारी अडीच वाजता शेजार्‍यांनी मला फोन केला. तुमच्या मुलीला कोणी तरी गळ्यावर आणि हाताच्या मनगटांवर कापले असून तिला कॉटेज हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. म्हणून मी तातडीने कॉटेज हॉस्पीटलमध्ये गेले. त्यावेळी मुलगी बोलत होती. तिने मला सांगितले की, आज्या दुपारी घरात आला होता. त्याने माझे तोंड दाबून माझ्या गळ्यावर आणि दोन्ही हातावर कशाने तरी कापले आहे. आज्या घरात आला त्यावेळी त्याची आई सुनीता गवळी आणि बहिण सौ. नीलम बाबर या त्यांच्या घरासमोरील अंगणात थांबल्या होत्या.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget