कुंबेफळ येथे रंगतोय वर्षानुवर्षे कुस्त्याचा फड नारळाच्या कुस्तीपासून होतोय प्रारंभ,लोकसह भागातून केला जातो आर्थिक निधी जमा


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- वर्षानुवर्षे कुस्त्याचा फड रंगतो असून गावातील नागरिकांकडून लोकसहभाग जमा केला जातो. गावातील दुकानदार, नोकरदार, शेतकरी, मजूर हे देखील घडल ती मदत देतात. यामुळे कुंबेफळ गाव ही कुस्त्याचा वर्षानुवर्षे पासूनची परंपरा जपत आहेत.

अंबाजोगाई तालुक्यातील मौजे कुंबेफळ गाव साधारण ५ हजार लोकसंख्या असेल शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात पिढ्यान्पिढ्या कुस्त्याचा फड रंगतोय .जवळपास मराठवाड्यातून पहेलवान कुस्ती खेळण्यासाठी येतात. 

घेण्यात येत असलेल्या कुस्त्याचे नियोजन येथील ग्रामपंचायतच्या वतीने गावकर्‍यांच्या लोकसहभागातून करण्यात येते. प्रत्येकवर्षी दिवाळीच्या पाडव्याला कुंबेफळ येथे कुस्त्याचा फड रंगतो. कुस्त्याची सुरुवात नारळाच्या कुस्ती पासून करण्यात येते.

त्यानंतर १० रुपये पासून सुरुवात केलेली कुस्ती शेवटी ५ हजार रुपये पर्यंत होते. यावर्षी देखील कुस्त्याचा फड रंगाला होता.गावातून ७५ हजार ३७६ रुपये लोकसहभाग जमा झाला होता.एकूण १७० कुस्त्या खेळण्यात आल्या यामध्ये पाहिलवानांना योग्य रक्कम देण्यात आली .शेवटची झालेली कुस्ती ३ हजार पाचशेची झाली दोन्ही पहेलवान 
सारखेच असल्याने त्या दोघांनाही आर्दी रक्कम देण्यात आली.विशंभर पिसाळ, रघुनाथ लुगडे, सोपान तोडकर, मुरलीधर हुलगे ,गणेश भोसले,शिवाजी डोईफोडे ,पत्रकार रोहिदास हातागळे, वसंत शिंपले,अशोक सोनवणे, अभिमन्यू भागवत, अनिल शिंदे, शेख महंमद, मधुकर भोसले,आदींनी परिश्रम घेतले.प्रत्येक वर्षीपेक्षा या वर्षी कुस्त्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. कुस्त्या बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कुंबेफळ गावात पिढ्यान्पिढ्या प्रत्येक दिवाळीच्या पाढव्याला कुस्त्या घेतल्या जातात परंतु गावात कुस्त्याचा आखाडा नाही. यासाठी गावकर्‍यांनी पुढाकार घेऊन गावात आखाडा तयार करावा जेणेकरून नवीन पिढीला ओस लागेल आणि गावात पहेलवान निर्माण होतील. ज्या गावात कुस्त्याचा फड रंगतो आणि तिथेच जर आखाडा नसेल तर फार मोठी शोकांतिका म्हणावे लागेल.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget