Breaking News

धनगर समाजालाही लवकरच आरक्षण देणार - मुख्यमंत्री


'धनगर आरक्षणाचा अहवाल तयार झालेला आहे. ज्या शिफारशी आम्हाला करायच्या आहे त्या पध्दतीचा हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात काही बाबींची पूर्तता करायची आहे. त्याची पूर्तता करून आम्ही धनगर आरक्षणाची शिफारस करू,' असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

'आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं जाईल. यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी मी विनंती करतो. धनगर आरक्षणाचा एटीआर आम्ही पुढच्या अधिवेशनापर्यंत सर्वांच्या समोर ठेवू, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी धनगर आरक्षणाबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

दरम्यान, मराठा आरक्षण विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या विधेयकाला सर्वपक्षीयांनी एकमताने सहमती दर्शवल्याने हे विधेयक मंजूर झालं आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळणार आहे.