ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात व्यापारी गोदामे, गृहसंकुले आदी मालमतेचे रक्षण करताहेत खाजगी सुरक्षा रक्षक कंपन्या
ठाणे : प्रतिनिधी

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात विविध कंपन्या, एमआयडीसी क्षेत्र आणि खाजगी व्यापाऱ्यांची गोदामे, ज्वेलर्स आणि मोठी गृहसंकुले, रस्त्यावरील कामे आदींचे संरक्षण करण्याची जबाबदारी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 34 खाजगी सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या कंपन्या पारपाडीत आहेत. या 34 कंपन्यांना ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून अधिकृत सुरक्षा रक्षक पुरविण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती उपलब्ध आहे. सन 2007 ते 2018 या कालावधीत सर्वाधिक परवाने ठाणे पोलिसांनी 2016 मध्ये 89 सुरक्षा रक्षक कंपनयना दिले आहेत. तर सर्वाधीक कमी परवाने 2013 मध्ये केवळ चार कंपन्यांनीच परवानगी मागितल्याचे समोर आले आहे.


ठाण्यात एमआयडीसी क्षेत्र, मोठी गृहसंकुले, मालाची गोदामे, नवनिर्माण बांधकामे त्याचा माल अशा विविध ठिकाणी दिवस आणि रात्री सुरक्षा रक्षकाची आवश्यकता भासते. या विविध कंपन्या आणि सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्या मालाचे, दुकानांच्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी अग्रेसर आहेत. ठाण्यात वागळे इस्टेट, डोंबवली, अंबरनाथ अशा विविध परिसरात कंपन्या, गोदामे, व्यापारी संकुले, सोनेचांदी दागिन्यांचे व्यापारी यांची दुकाने, हॉटेल्स, बार अशा विविध ठिकाणी मालमत्तेचे रक्षण हे विविध नियुक्त सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या कंपन्यांचे सुरक्षा रक्षक करीत आहेत. यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातून दरवर्षी या खाजगी सुरक्षा रक्षक कंपन्यांना परवाना देण्यात येतो. ठाणे परिक्षेत्रात अनेक मोठी गृहसंकुलेही आहेत. या गृहसंकुलांच्या प्रवेशद्वारावर पहारा तैनात ठेवून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची तपासणी याच खाजगी सुरक्षा रक्षकाकडून करण्यात येते. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परवानगीने सध्या ठाणे आयुक्तालयात तब्बल 34 सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या खाजगी कंपन्या कार्यरत आहेत. एखादी घटना घडल्यास याच सुरक्षा रक्षकाचा पोलिसांना तपासकामी चांगला उपयोग होतो. परवाने दिल्याने कुठल्या सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या परवानाधारक कंपनीचे सुरक्षा रक्षक कार्यरत होते यांची माहितीही उपलब्ध होते.


ठाणे आयुक्तालयाच्या परिसरात असलेल्या उद्योग, व्यापारी संकुले, मालाची गोदामे, इमारतीचे नवनिर्माण सुरु असताना साईटवर पडलेल्या मालाचे संरक्षण याच खाजगी कंपन्यांच्या सुरक्षा रक्षक करीत असतात. सन 2007 ते सन 2018 कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयाने आतापर्यंत तब्बल 378 विविध खाजगी सुरक्षा रक्षक कंपन्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. यात सन 2007 पासून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार खाजगी सुरक्षा रक्षकाच्या कार्यपद्धतीवर विश्वास प्रगत करीत खाजगी सुरक्षा रक्षकाच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. सन 2007 साली 8 खाजगी सुरक्षा रक्षक कंपन्यांना परवानगी देण्यात आली होती. तर 2008 मध्ये 9 कंपन्या, 2009 मध्ये 18 कंपन्या, 2010 मध्ये 23 सुरक्षा रक्षक कंपन्या, 2011 मध्ये 37 कंपन्या, 2012 मध्ये 48 खाजगी सुरक्षा रक्षकांच्या कंपन्यांना परवानगी देण्यात अली होती. दर वर्षी सुरक्षा रक्षकांची मागणी वाढत असल्याने खाजगी कंपन्या पोलीस आयुक्तालयाकडे परवानगी मागण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. तर सन 2013 मध्ये खाजगी कंपन्यांची उत्सुकता रोढावलेली दिसत असून केवळ 4 खाजगी कंपन्यांनी परवानगी मागितली होती. तर सन 2014 मध्ये पुन्हा 48 कंपन्यांना परवानगी देण्यात आली. सन 2015 मध्ये 23 कंपन्यांना, 2016 मध्ये 89 कंपन्यांना परवानगी ठाणे पोलिसांनी दिली. सन 2017 साली 35 तर सन 2018 मध्ये 34 खाजगी सुरासखा रक्षक पुरविणाऱ्या कंपन्यांना ठाणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. ठाणे आयुक्तालयात अनेक महत्वाच्या कंपन्या, गोदामे, व्यापारी संकुले, मोठी हॉटेल्स, ज्वेलर्स दुकाने, कार्यालय, गृहसंकुले अशा अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकाच्या मागणी वाढत असल्याने ठाणे परिसरात सुरक्षेची जबाबदारी पार पाडणायसाठी खाजगी सुरक्षा रक्षक कंपन्या पुढे येत असल्याचे चित्र आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget