ऐन दिवाळीत साथीच्या आजारांनी नागरिकांचा निघतोय दिवाळा; यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने


अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐन दिवाळीत साथीच्या आजारांनी सर्वसामान्य नागरिकांचा दिवाळा काढला असताना, साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पाठपुरावा करुन देखील त्याची दखल घेतली न गेल्याने असक्षम ठरलेल्या मनपा आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने येत्या दोन दिवसात साडी-चोळीसह बागड्यांचा आहेर देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्यासह साधनाताई बोरुडे, रंजना उकिर्डे, श्रीलता आडेप, अनिकेत कोळपकर, आदित्य जगधने, ऋतिक साळुंके यांनी शहराच्या खाजगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात डेंग्यू, चिकनगुण्या आदी साथीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. रुग्णांनी देखील महापालिकेकडून राहत असलेल्या ठिकाणी वेळेवर फवारणी झाले नसल्याचे सांगितले. तसेच यासंबंधी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम. मुरंबीकर, आरएमओ एस.के. सोनवणे यांच्याशी चर्चा केली. मोठ्या प्रमाणात शहरातील साथीच्या आजारांनी पिडीत रुग्ण खाजगी व सरकारी दवाखान्यात उपचार घेत असून, मनपा आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराने त्यांची दिवाळी हॉस्पिटलमध्येच साजरी होणार आहे. तर सामान्य कुटुंबातील रुग्णांना वैद्यकिय खर्चामुळे दिवाळी साजरी करता येऊ शकणार नाही. यशस्विनी महिला ब्रिगेडने पावसाळ्याच्या प्रारंभी महापालिकेच्या मलेरिया विभागाला अचानक भेट देऊन या विभागात उपलब्ध नसलेली यंत्रसामुग्री, अस्वच्छता, गळके पत्रे, अपुरे मनुष्यबळ आदी दुरावस्थेच्या सर्वबाबी निदर्शनास आनल्या होत्या. तर साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी तातडीने उपाय योजना करुन, महापालिकेच्या मलेरिया विभागाची झालेली दुरावस्था दूर करावी व शहरात नियमीत फवारणी व फॉगिंग करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर उपाय योजना न झाल्याने शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. एक प्रकारे मनपाचे आरोग्य विभागच आजारी पडल्याची स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप रेखा जरे पाटील यांनी केला आहे.

शहरात वेळीच साथीचे आजार नियंत्रणात आनण्यासाठी उपाय योजना केल्या असत्या तर नगरकारांची दिवाळी हॉस्पिटलमध्ये साजरी झाली नसती. साथीच्या आजारावर उपचारासाठी पंधरा ते वीस हजार रुपयापेक्षा जास्त खर्च येत असून, दिवाळी साजरी करावी की हॉस्पिटलमध्ये पैसे खर्च करावे या गंभीर अवस्थेत नगरकर सापडले आहेत. प्रत्येक परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असून, याला जबाबदार मनपाचे आरोग्य विभाग व संबंधीत अधिकारी असल्याचे जरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget